तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

शाळाबाह्य मुलांना गणवेश मोफत वाटप

सुभाष मुळे..
--------------
गेवराई, दि. ११ ( प्रतिनिधी ) शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मोहिम हाती घेतलेली आहे. यामध्ये खारिचा वाटा उचलुन सिरसमार्ग येथिल स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्या वतीने माजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त भौतिक सुखसोयींपासुन वंचित व उपेक्षित असलेल्या २८ शाळाबाह्य मुलांना बुधवार, दि.१० रोजी मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
     गेवराई येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत हा मोफत गणवेश वाटपाचा उपक्रम पार पडला. याप्रसंगी माजी नगरसेवक गोरख शिंदे, दतात्रय दाभाडे (राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष), स्वाभिमानी युवा ब्रिगेडचे प्रा. आसाराम पवळ, मुख्याध्यापक गोपाळघरे पि.यू. यांची प्रमुख उपस्थिती होती. गेवराईचे पं.स. चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रविण काळम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेचे शिक्षक तथा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन नामदेवराव शिंदे यांनी गेवराई शहरातील विश्रामगृहाच्या मागे पालात राहुन व भिक्षा मागुन जीवन कंठत असलेल्या, विशेष म्हणजे कधी शाळेचे तोंड न पाहिलेल्या मुलांचा शोध घेवुन त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सदरिल शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक साहित्य व ईतर सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सिरसमार्ग येथील विजयराजे पंडित स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्या वतिने माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शाळेतील गरिब व होतकरु अशा २८ शाळाबाह्य मुलांना शाळेच्या गणवेशाचे मोफत वाटप केले. शाळेतील उपक्रमशिल शिक्षक विष्णुपंत आव्हाड, शिवाजी आव्हाड, भाऊसाहेब जोशी, किशोर खरात यांनी सदरील मुलांना यापुर्विच स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
      या उपक्रमासाठी सिरसमार्ग येथील स्वाभिमानी युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते तथा माजी सरपंच श्री. सोमेश्वर गचांडे, प्रा.आसाराम पवळ, सुहास पवळ, नारायण कोळेकर, माऊली सुळ, दादा पवळ, पांडुरंग पवळ, संतोष शेजाळ, आशोक टाकसाळ, अमर नेमाने यांनी पुढाकार घेतला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment