तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

विविध शासकीय योजनेच्या लाभासाठी युवा शेतक-याचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा ईशारा


(सेनगाव तहसिलदार वैशाली पाटील यांना दिले लेखी निवेदन)

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:-तालुक्यातील ताकतोडा येथील 27 वर्षीय युवा शेतकरी नामदेव लक्ष्मणराव पतंगे यांनी विविध शासकीय योजनेचा परीपुर्ण लाभ मिलत नसल्याने तसेच शेतीच्या पिकाला योग्य भाव मिलत नसल्याने लेखी निवेदनाव्दारे मंत्रालयासमोर आत्मदहनाचा ईशारा सेनगाव तहसिलदार वैशाली पाटील यांच्याकडे दि.12 आक्टोबर शुक्रवार रोजी केला आहे.
यामध्ये कर्जमाफी तसेच पिककर्ज न मिलने वडीलोपार्जीत शेतजमीन वेगली करण्यात यावी बँकेकडुन मुद्राकर्ज देण्यासाठी बँक व्यवस्थापकाने पैसे उकलले सिंचनासाठी व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेल,महावितरणकडुन नविन विज कनेक्शन देण्यास टालाटाल,अत्यल्प शेती मालाला कमीभाव तसेच उत्पन्न ही कमी,शासकीय योजनेमध्ये शासनाचे चुकीचे धोरण,माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार द्या.या आठ मुद्यासाठी आपण शासकीय योजनेच्या गलथान कारभारा विषयी शासनाला जागे करण्यासाठी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे नामदेव पतंगे या युवा शेतक-याने तेजन्यूज हेडलाईन्सच्या प्रतिनीधीशी बोलतांना सांगितले.माझ्या आईच्या नावाने एकुण चार एकर 28 आर जमिन आहे या जमिनीवर पुर्वी 60 हजार रुपये पिककर्ज घेतले होते.यावर्षी उसनवारी करुन ती रक्कम वाढीव कर्ज मागणीसाठी बँकेत गेलो असता बँकेने सामाईक क्षेत्र असल्याने पिककर्ज देण्यास नकार दिला.सामाईक क्षेत्र वेगले करण्यासाठी तहसिल विभागाने 85(2) प्रमाणे वेगले करु शकत नाही असे सांगितले.तसेच रजिस्ट्री आँफीस मध्ये हि जमिन वेगली करुन घ्या असे सांगितले जमिनीची गुणवत्ता प्रमाणे 1 लाख 60 हजार एवढा खर्च रजिष्टार यांनी सांगितला तर खाजगी व्यक्तींनी 60 हजाराची मागणी केली.वडीलोपार्जीत जमिनीसाठी एवढा खर्च पाहुन मी पुरताच खचलो आहे.मुद्रालोण साठी दहा टक्के रक्कम दिल्यानंतर 1 लाख 80 हजार मुद्रालोण मंजुर झाले माझ्या शेतातील सिंचन व्यवस्थेसाठी शासन दरबारी खेटे घेऊन ही त्याचा फायदा न झाल्याने शेतातील साेयाबिन पिक करपुन गेले.महावितरणाकडे कोटेशन भरुन ही विजजोडणी होत नसल्याने आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबावर अन्यायच होत आहे.सतत तिन वर्षापासुन अत्यल्प पाऊस पडत असल्याने दरवर्षी उत्पन्नात घट होत असुन भाव ही मिलत नसल्याने दुष्कालजन्य परीस्थिती निर्माण होऊन आमच्यावर जिव देण्याची वेल येऊन ठेपली आहे.विविध शासकीय योजनेत टक्केवारी दिल्याशिवाय व लोकवाटा भरल्याशिवाय मिलत नसल्याने शासकीय अधिकारी वर्गाकडे खेटे घेता घेता माणसाचे जनावरासारखे हाल होत आहेत.साहेब जिव खुप प्यारा आहे पण जगायचे कसे हा प्रश्न आमच्या समोर पडला आहे.माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार द्या साहेब. मला माहीत आहे माझे हे निवेदन सुध्दा रद्दी कागद म्हणुन पडणार आहे त्यामुले मंत्रालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही असे लेखी निवेदन सेनगाव तहसिलदार वैशाली पाटील यांच्याकडे ताकतोडा येथील युवक नामदेव लक्ष्मणराव पतंगे यांनी दिली आहे.

No comments:

Post a comment