तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद औरंगाबाद येथे इंग्लिश स्कुल संघटनेचा जागरण गोंधळ मोर्चा.......

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्याकडील सर्व प्रश्न निकाली काढावेत यासाठी इंग्रजी शाळा, संस्थाचालक संघटनेच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली काढले नाही याउलट त्यांना निवेदन किंवा प्रश्न घेऊन येणाऱ्यांसोबत संवाद बरोबर करत नाही.त्यामुळे जिल्हाभर संतापाची भावना व खेद व्यक्त केला जात आहे.या निष्क्रिय शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात व प्रमुख मागण्या तात्काळ निकाली काढण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे,संघटक मनीष हांडे,जिल्हाध्यक्ष प्रवीण आव्हाळे, रत्नाकर फाळके, तालुका संपर्कप्रमुख संतोष दोडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी यांना सद्बुद्धी व बळ देवो यासाठी माहूर गडावरील रेणुकामाता,वणीची सप्तशृंगी माता,कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि औरंगाबाद,साताऱ्याचे दैवत मल्हार मार्तंड खंडोबा यांना आज जोगवा मागून जागरण गोंधळ घालून शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात खांद्यावर काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला.
यामध्ये आर.टी.ई 25 % अंतर्गत 2012/13 पासून आज पर्यंत सर्व थकीत रक्कम आजच द्यावी,सर्व प्रलंबित 3:1 ,नैसर्गिक वर्ग वाढ तात्काळ द्यावी,आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश संस्था अंतर्गत शाळेत वर्ग करण्यास तात्काळ मंजुरी द्यावी,आर.टी. ई 25% अंतर्गत प्रत्येक वर्गातील रिक्तपद मुख्यध्यापकांना ऑफलाईन भरण्यास परवानगी द्यावी,शाळा हस्तांतर,स्थलांतर प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा,शाळेची फी बुडवणाऱ्या पालकांच्या पाल्याचा प्रवेश पुढील वर्षी रद्द करण्याचा अधिकार शाळांना असल्याबाबतचे पत्र सर्व शाळांना काढावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

No comments:

Post a Comment