तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 October 2018

राज्य ज्युनियर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ

रत्नागिरी :-महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यास्पर्धेत राष्ट्रीय पातळींवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी रत्नागिरीकरांना उपल्बध झाली आहे.

जिल्हा क्रीडा संकुल येथे आज मंगळवार पासून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गद्रे मरीन कंपनीचे संचालक अर्जुन गद्रे,महाराष्ट्र खो-खो असोसिएषनचे सरचिटणीस संदीप तावडे,रत्नागिरीत जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार हजारे, रजनीश महागावकर, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अमित मुळ्ये,उद्योजक अमर देसाई,आनंद देसाई प्रसन्न आंबुलकर,प्रसन्न पेठे व उतर मान्यवर उपस्थित होते.
17 व 19 वर्षांखालिल राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार्‍या तिनपैकी दोन निवड चाचणीत प्रथम आणि द्वितीय मानांकन मिळविणारे रोहन गुर्बानी, वरुण कपुर, जान्हवी कान्हीटकर, आर्या देशपांडे यांच्यासह नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांच्या अष्टपैलू खेळाचा थरार पाहण्याची संधी रत्नागिरीतील बॅडमिंटनपटूंना या निमित्ताने मिळणार आहे.

निवड चाचणीसाठी दोन्ही वयोगटातील मुले, मुली गटातील एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच गटांमध्ये सामने होतील. राज्यभरातील पाचशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार असून त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या स्पर्धेतून प्रत्येकी आठ जणांचा संघ निवडण्यात येणार आहे. तो संघ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होईल. दोन लाख पाच हजार रुपयांची पारितोषीके विजेत्या खेळाडूंसाठी उपलब्ध केली असल्याचे हजारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment