तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

हशिप्रमं च्या पाच विद्यार्थ्यांची खोखो संघात निवड


सोनपेठ :
येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय व कै. राजाभाऊ कदम इंग्लिश स्कुल या दोन शिक्षण संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि.२८ ऑक्टोबर रविवार रोजी मानवत येथील के.के.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर पारपडलेल्या निवड चाचणीत १८वर्ष कुमार वयोगटात ४८ खेळाडूमधून अकरा खेळाडूंमधे कै.राजाभाऊ कदम विद्यालय (एल.आर. के.स्कुल) सोनपेठ चे तीन तर कै.रमेश वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आगामी दि. २० नोव्हेंबर रोजी मंचर जि.पुणे येथे राज्यस्तरीय खो-खो सामन्यात खेळण्यासाठी निवड झाली आहे. ही निवड खो-खो असोसिएशन परभणी चे पवन बारहाते, रणजित जाधव, राम चोखट, नाना धर्मे, विकास पाचलींग व आदींनी केली आहे. निवड झालेल्या खेेळाडू मध्ये सदरील शिक्षण संस्थेच्या अशोक धर्मे, श्याम धर्मे, ज्ञानेश्वर कावळे, अशोक जाधव, बाळू आलाट या पाच खेळाडूंचा समावेश आहे.
या सर्वांचे निवडीबद्दल हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, प्राचार्या शकिला शेख, मुख्यध्यापक दत्ता नरहारे, पत्रकार गणेश पाटील, क्रिडा संचालक गोविंद वाकणकर क्रीडा समितीचे सर्व सदस्य प्रा. डॉ. कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. आशोकराव जाधव, प्रा. डॉ. संतोष रणखांब आणि शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment