तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

ऊसाला लागलेल्या हुमनी अळीची शास्त्रज्ञां कडून पहाणी

प्रतिनिधी
पाथरी:-या वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड असून या उसावर हुमनी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उस वाळत असून शेतक-यां पुढे नविनच संकट उभे राहीले आहे. या साठी गुरूवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटक शास्रविभागातील शास्त्रज्ञ पाटील, सय्यद तालुका कृषी अधिकारी शिंदे ,भिसे यांच्या पथकाने रेणापुर येथील उस उत्पादक शेतक-यांच्या शेतात भेट देऊन पहाणी केली आणि या वर उपाय सुचवले.
तालुक्यातील रेणापुर येथे कृषी विभागाच्या वतिने विद्यापिठातील शास्त्रज्ञां सह ऊसाच्या शेतीला भेट देऊन पहाणी केली या वेळी हे पथक संदिप टेंगसे, अदिनाथ टेंगसे, महादेव वाघमारे,भगवान पाटील, यांच्या शेतावर जाऊन पहाणी केली हलक्या जमिनित हुमनी जास्त प्रमाणात राहाते असे मत त्यांनी व्यक्त करून पाणी कमी असल्यास हा प्रकार दिसून येतो असे पाटील यांनी सांगून या वर मेट्रायझीन नावाचे जैविक उपाय असल्याचे सांगितले या सोबतच उसाच्या वेगवेगळ्या जातीवर हुमनी सह, चिकट्या पिठ्या ढेकून, आणि खोडकीड या रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे यातील तज्ञांनी सांगून या साठीची उपाययोजना ही सांगीतल्याचे शेतकरी संदिप टेंगसे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment