तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

पुर्णा तालुक्यातील आडगाव शिवारात डोक्यात दगड घालून झालेल्या निर्घृण खुनाचा तपास लावण्यात पोलीसांना यश...!


पो.उप.नि.चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाची यशस्वी कामगिरी, ३ आरोपी पोलीसांच्या ताब्यात

मयत सिताराम यादव याने पत्त्याच्या डावात आरोपीतांचे सर्व पैसे जिकल्याने चिडून त्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची आरोपींनी दिली कबूली

पुर्णा/येथील आडगाव शिवारातील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहा मागील परिसरात रेल्वे पटरी लगत मागील दोन महिण्यापूर्वी दि.०४ अॉगस्ट २०१८ रोजी वयजोडा ता.परतूर जिल्हा जालना येथील सिताराम शेषराव यादव या इसमाचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती या घटने संदर्भात पुर्णा पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीं विरोधात गुरनं.क्र.११०/२०१८ कलम ३०२ भादवी प्रमाणे गुन्हा ही दाखल करण्यात आला होता सदरील घटनेला दोन महिणे पाच दिवसांचा कालावधी उलटल्या नंतर ही शोध लागत नव्हता कारण घटनेतील आरोपीतांनी खुनाचा सुगावा लागू नयें या उद्देशाने कुठलाच पुरावा सोडला नव्हता त्यामुळे पोलीस प्रशासनही हतबल झाले होते या घटनेचा तपास लावण्यासाठी पुर्णा पोलीस स्थानकातील कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पो.उप.नि.चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकातील पो.काँ.नितीन वडकर,चंद्रमुणी हाणवते,चंद्रशेखर कलवले,किशोर कवठेकर,दत्ता काकडे,मिलींद कांबळे आदींचे पथक नेमण्यात आले होते सदरील पथक सातत्याने मागील दोन महिण्यापासून गुन्हा उघडकीस आणन्या करीता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते पथकातील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी वेशभुषा धारण करुण आडगाव शिवारात फिरुण माहिती काढली यावेळी पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरील गुन्ह्यातील मयताचा खुन हा आरोपी सय्यद फारुख सय्यद अय्यूब रा.हिंगोली गेट पुर्णा,विठ्ठल गंगाधर गौड रा.आडगाव लासीना,शेख फेरोज शेख अहमद रा.क्रांतिनगर पुर्णा व त्यांचे इतर साथीदारांनी केला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर आज मंगळवार  दि.०९ अॉक्टोंबर रोजी पो.उप.नि.चंद्रकांत पवार व पथकातील पो.काँ.नितीन वडकर,चंद्रमुणी हनवते,चंद्रशेखर कलवले,किशोर कामठेकर यांनी तिनही आरोपीतांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबूली देऊन असे सांगितले की मयत सिताराम यादव याने पत्त्याच्या डावात आमचे सर्व पैसे जिकल्याने चिडून आम्ही त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली सदरील गुन्ह्यात आरोपींनी कुठलाही सबळ असा पुरावा सोडला नसतांनाही कर्तव्यकठोर अधिकारी पोउपनि.चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील खालील पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले पो.नि.घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिण्यापूर्वी घडलेल्या खुनाचा तपास लावण्यात यशस्वी कामगिरी बजावल्याने त्यांचे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण उपाध्याय व अप्पर पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्यासह जनसामान्यांतून ही कौतुक होत आहे..

No comments:

Post a comment