तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

नियमनमुक्ती च्या निर्णयाचे शेतकरी संघटनेकडून फटाके फोडुन स्वागत तर शेकापकडून निषेध


सोनपेठ : राज्य शासनाने शेतीमाल नियमुक्त करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाचे स्वागत शेतकरी संघटनेने फटाके फोडुन मिठाई वाटुन केले. तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध करून हमीभावाने सरकारने हा भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे खरेदी करावा असे म्हटले आहे.
राज्यात सध्या शेतकऱ्यांना अतिशय चुकीच्या धोरणांना बळी पडावे लागत असताना भाजीपाला फळे व फुले नियमनमुक्ती नंतर पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने सर्वच शेतमाल नियमन मुक्त करण्याची मागणी लावुन धरली होती. मत्र्यांचीच स्वतःची मागणी असल्याने सदाभाऊ यांच्या मागणीस राज्यसरकारने सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णया बद्दल संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटना अनेक वर्षापासुन ही मागणी करत आहे. यातच या धोरणामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होणार असल्याचे मत शेकापचे भाई गणेश हेंडगे पाटील यांनी व्यक्त केले तर सोनपेठ शहरातील शिवाजी चौकात शेतकरी संघटनेने नियमनमुक्ती च्या निर्णयाचे स्वागत फटाके फोडुन व मिठाई वाटुन केले.या वेळी राज्य शासन व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव ही संघटनेने प्रशासनास पाठवला आहे.शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळण्याची ही पहिली पायरी असल्याचे मत शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी व्यक्त केले असुन यावेळी शेतकरी संघटनेचे माधव जाधव ,सोमनाथ नागुरे,सुर्यकांत कदम, केशव मोहिते, गोपीनाथ भंडारे, मुंजा तेलभरे, द्वारकदास तेलभरे,देवीदास भुजबळ,माणिक काळे,दत्ता पवार यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment