तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

परळी विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी हनुमंत गुट्टे यांची निवड


काँग्रेस पक्षाचे काम वाढविण्यसाठी सदैव तत्पर राहणार-हनुमंत गुट्टे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
        परळी विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांचे कट्टर समर्थक नंदनज येथील ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गुट्टे यांची निवड करण्यात आली.
     युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच निवडणुकीच्या माध्यमातुन पार पडली. त्यात सरचिटणीसपदी हनुमंत गुट्टे यांची  निवड करण्यात आल्याबद्दल परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा.विजय मुंडे व उपाध्यक्ष मनोज संकाये यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
    परळी विधानसभा मतदारसंघात युवकांचे संघटन वाढविण्यासाठी मतदार संघ अध्यक्ष प्रा.विजय मुंडे, जि.प.सदस्य प्रदिप मुंडे व इतर नुतन पदाधिकार्‍यांचे सोबत काम करणार आहे. काँग्रेसच अखिल भारतीय कमिटीचे सदस्य प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे वाढविण्यासाठी आपण आहोरात्र परिश्रम करणार असल्याची ग्वाही हनुमंत गुट्टे यांनी दिली.

No comments:

Post a Comment