तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

भक्तांंच्या हाकेला धावणारी.. गेवराई येथील 'श्री रेणूकादेवी'

सुभाष मुळे...
----------------
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंम्बके गौरी, नारायणि नमोsस्तुते ॥
हे नारायणी, तूच सर्व शुभतेचे मंगलमयी प्रतिक आहेस. मनोकामना पूर्ण करणारी आई तूच आहेस. शरण आलेल्या भक्तांना शरण देणारी दात्री आहेस. त्रैलोकाची जननी तूच आहेस. अद्धकारातून प्रकाश किरण दाखवणारी, चेतना जागृत करणारी शक्ती तूच आहेस. तुला माझे शतशः नमन. गौरीपूर निवासिनी अर्थात श्री रेणूकादेवी. गेवराई शहराच्या वैभवात भर घालणारे, अगदी शहराच्या मध्यभागी वसलेली ही आई रेणूकादेवी. नवरात्र मध्ये भक्ताच्या गर्दीने अगदी फुलून जातं, यामुळेच बीड जिल्ह्यातील गेवराई शहराचे आराध्य दैवत असलेले श्री रेणूकादेवी मंदिर नेहमीच विलोभनीय दिसते.
      देवीच्या साडेतीन पिठापैकी एक पीठ असलेले माहूर या देवीच मूळ स्वरूप आहे. भक्ताच्या हाकेला ओ देणारी भक्तांंसाठी धाऊन जाणारी त्यांंच्या मनोकामना, ईच्छापूर्ती करणारी एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे. आई राधे उदे उदे.. म्हणतं भक्ताच्या देवीच्या दर्शनसाठी लांबच लांब रांगा असतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर असा तांदळा (मुखवडा) आहे. या देवीच्या चेहऱ्यावर तेजपुंंज्य व मनमोहक असे भाव दिसतात. मंदिरात प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न होऊन जातं. या रेणूका मातेचे मुळ स्वरूप ३३ कोटी देवांची माता आदिती माता आहे. म्हणून तिने आपला पुत्र परशुरामास फक्त अर्धमुखातून दर्शन दिले. याच कारणामुळे या देवीचे तांदळेच आहेत. देवीचा शेंदूरमय तांदळा हाच ओंकार स्वरूप कल्याणकारक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या रेणुकादेवीची माहीती स्कंदपुराणात सांगितली आहे. रेणूकादेवीचा जन्म हा आरंभाच्या युगात म्हणजे त्यास कृतयुग म्हणतात . याच काळात रेणू नावाचा एक राजा होता. त्या राजाने एक यज्ञ केला. त्या यमातून अग्निनारायण प्रसाद म्हणून एक  तेजस्वी कन्या अर्पण केली. या तेजस्वी कन्येचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले. पुढे ही कन्या मोठी झाल्यावर तीचे स्वयंमवर रचले गेले. या स्वयंमवरामध्ये अनेक राजे, महाराजे, ब्राह्मण, विविध क्षेत्रात निपूण, विद्वान महापुरूषांंना आमंत्रित करण्यात आले होते. या आमंत्रितांंमध्येे विद्वान, गुणवान अष्टपैलू नेतृत्व जमद्ग्नीशी रेणूकामाताचे स्वयंमवर मोठ्या थाटात संपन्न झाले, परंतू हा विवाह जातिवंतराजे व इतर लोकांना मान्य झाला नाही. कारण मुलगी राजकन्या व मुलगा हा साधा ब्राह्मण होता त्यांना अपमान वाटू लागला. पुढे त्यांच्या युध्द झाले या घनघोर युध्दात शेवटी जमदग्नीचा विजय झाला. कालांतराने त्यांना पाच मुले झाली, त्यापैकी परशुराम एक. परशुराम अत्यंत जिद्दी व धाडसी होता. परशुरामाने वडिलांची आज्ञा घेऊन  शिव व श्रीगणेश यांची अथक तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले आणि अनेक शस्त्रे मिळवली. पुढे एके दिवशी रेणुकामातेने परशूरामाला आज्ञा केली की, या पृथ्वीतलावर सर्व तिर्थ एकाच जागी असलेल्या जागेवर माझी प्रतिष्ठापना कर. परशुरामाने आईच्या आज्ञेचे पालन करून सिंह पर्वतावरील श्री क्षेत्र माहूर देवीची स्थापना केली.
      रेणूकामाता म्हणजे जगात अवतरून साध्वी, सती, पतिव्रता असल्यामुळे तिला त्रिलोकातील देव, दानव, गंधर्व व अप्सरा सुध्दा देवीचा जय जयकार करतात. गेवराई येथील रेणूका गौरी स्वरूपात राहिली म्हणून हा जंगदबा गौरी स्वरूपी आहे. गेवराई शहराचे यामुळेच पुर्वीचे नाव गौरीपूर होते. आता या मंदिरात भव्य सभामंडप झाला आहे. या सभामंडप शेजारीच महादेवाचे सिध्देश्वर मंदिर आहे, एक आकर्षक दीपमाळ देखील आहे, मंदिरा समोर एक यज्ञकुंड आहे. आश्विन शु. नवमीच्या दिवशी विद्वान ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराने यज्ञात आहूती देण्यात येते. या यज्ञविधी मंदिरातील सभा मंडप भक्त जणांनी अगदी फुलून जातो. ही भावीक भक्त आपल्या इच्छा अपेक्षाच्या पुर्ती करण्याच्या दृष्टीने मनोभावे या यज्ञकुडांत श्रीफळाच्या रूपाने आहूती देतात. या मंदिरात नवरात्र महोत्सव अगदी थाडात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या नवरात्र मध्ये नऊ दिवस भाविक उपवास ठेवतात तर काही स्त्रिया ज्यांनी नवस केला आहे. त्या नऊ दिवस उपवास धरून मंदिरात बसतात. त्यांची चोख व्यवस्था त्याचं संपूर्ण नियोजन यशंवत रूकर व मंदिर ट्रस्टी पाहतात. या नवरात्री मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. या कार्यक्रमाची रूप रेषा अशी की, पहाटे पाच वाजता  मंगलमय मुहुर्तावर महापूजा, सहा वाजता आरती, दुपारी भजन व प्रवचन, रात्री सात वाजता महाआरती होत असूून या आरतीसाठी नवरात्र काळात भक्तांंची मंदियाळी असते. संध्याकाळी भागवत पुराणाचे वाचन ह.भ.प माने महाराज करतात. त्यानंतर भजन किर्तनाचा कार्यक्रम होतो. या उत्सवामुळे मंदिराचे व परिसरमधील वातावरण अतिशय मंगलमय व ऊर्जा देऊन जाणार असतं. आई राजा उदो उदो.. या जय घोषात अगदी नऊ दिवस मंदिर परिसर गुंंजतो. आई रेणुकामाताच्या चरणी डोकं ठेऊन भावीक मोठ्या श्रध्देने नतमस्तक होतात ... विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणच्या रोशनाईने अजून दिव्य शोभा दिसून येते. गेवराई शहरातील पोलिस बंदोबस्त सुध्दा अगदी चोख असतो. यज्ञ झाल्यानंतर विजयादशमी दिवशी पालखी सिमोल्लंघनासाठी मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी निघते. तो जयघोष व कवड्याची माळ घातलेले भाविक आणि हाती पोत घेऊन वाजत गाजत पालखी या ठिकाणी येते. या मैदानावर सिमोल्लंघनाचा  कार्यक्रम होतो. सोन्याची ( आपट्यांची ) लूटकरून देवीच्या अंगावर टाकून दर्शन घेऊन भाविक मोठ्या श्रध्देने परतत असतात. या मैदानावर अनेक लोक एकत्र हा भव्यदिव्य सोहळा अनुभवण्यासाठी एकत्र जमातात व सोनं लुटून आपापल्या घरी जाऊन सिमोलंघनास पुर्णविराम देतात. बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतो. या ठिकाणी आपट्याचे सोने देऊन प्रेमाचे आलिंग्न देतात.
       या नवरात्रात भावीक भक्तांंची गर्दी दाटून येते. नुकतेच मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम प्रगतीवर असून भाविक या मंदिराच्या कामासाठी खारीचा वाटा म्हणून स्वईच्छेने मदत करू शकतील. थेंंब थेंंब तळे साचे या म्हणी प्रमाणे या ठिकाणी लोकवर्गणीतून व आमदार फंडातून काही काम झाले आहे. अशा प्रकारे देवीच्या जयघोषात हा नवरात्र महोत्सवाची सांगता होते. या दिवसामध्ये उपेक्षित वनस्पतींना महत्व येते. तरवड्याची फुले, विविध व आकर्षक पाने फुलांची माळ अर्पण केली जाते. घरात गुगळाचा सुवास अशा मंगलमय वातावरण मध्ये घरात सुध्दा नवरात्र उत्साहाला उधाण येते. आता गणपती उत्सव प्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होऊ लागल्याचे चित्र दिसून येते. सर्व भावीक भक्तांंच्या ईच्छा आई रेणुकादेवी पूर्ण करोत हीच तिच्या चरणी प्रार्थना ...... आई राजा उदो, उदो...

---------------------------------
संकलन - श्री यशंवत रूकर
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment