तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 October 2018

वाढदिवस खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना दिला मदतीचा हात

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रशांत कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे केले कौतुक

वाढदिवसातुन कराड यांनी दिला सामाजिक बांधिलकिचा संदेश

युवा शक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम  सामाजिक बांधिलकी जपत प्रशांत कराड यांचा वाढदिवस साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- गेल्या चार महिन्या पासुन पावसाने गुंगारा दिल्याने खरीपाची पिके वाया गेली व रब्बीची पेरणी झाली नाही. त्यामुळे परळी तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत लिंबोटा येथील युवक नेते प्रशांत कराड यांनी वाढदिवसावर खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. प्रशांत कराड यांच्या आवाहनास प्रतिसाद देत युवा शक्ती प्रतिष्ठानने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे ठरविले आणि त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले.  
     बीड जिल्ह्याच्या दबंग खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रशांत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कार्यक्रमाचे  सर्व उपक्रमांचे कौतुकास्पद उपक्रम राबविले आहेत. तसेच प्रत्येकाने आपले वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरे करावेत असे आवाहन ही केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्ष कन्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्यातील विक्रमादित्य खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासु म्हणून परळी विधानसभा मतदारसंघात कराड यांना ओळखले जातात. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आपली वाटचाल व पाऊलावर पाऊल ठेवून मतदारसंघात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
    दुष्काळी परिस्थितीचे भान लक्षात घेवून इतरत्र खर्च टाळून व वाढदिवसाच्या हार, तुरा, शाल, श्रीफळ या गोष्टीला फाटा देण्यासाठी वाढदिवस निमित्ताने समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून सोमवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 7 वाजता दुष्काळाचे सावट दुर होण्यासाठी श्री. प्रभु वैद्यनाथस लघुरुद्र अभिषेक , सकाळी 10 वाजता लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळ गोपीनाथ गडाचे दर्शन, सकाळी 11 वाजता पांगरी गणातील  प्रत्येक गाव वाड्या, वस्त्या, तांड्यांवर जनावरांना पिण्याच्या पाण्याचे शेतकर्‍यांना हौद वाटप व पक्षांसाठी पाणवटे वाटप, सकाळी 11.30 श्री.संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सकाळी 12 ते 1 श्री हनुमान मंदिर लिंबोटा येथे रामायणाचार्य ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे यांचे सुश्राव्य किर्तन व श्री हनुमान मंदिर येथे दुपारी 2 वाजता महाप्रसाद, दुपारी 4 वाजता फुलचंदभाऊ कराड यांचे संपर्क कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळा, संध्याकाळी 6 वाजता तालुक्यातील लिंबोटा येथे अभिष्टचिंतन सोहळा तसेच रात्रौ 8 वाजता श्री हनुमान मंदिर लिंबोटा येथे वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर (नाना) यांचे किर्तन हे कार्यक्रम घेण्यात आले. वाढदिवसानिमित्त महाराजांनी दिले शुभ अशिर्वाद व अशी सेवा उत्तरात्र घडो.
     वाढदिवसानिमित्त वायफट खर्च टाळून पांगरी गणातील शेतकरी व नागरिकासाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कराड परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. दरवर्षी असे उपक्रम राबवितात. आज ही वाढदिवसातून कराड परिवार यांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.       
    लिंबोटा येथील प्रशांत कराड यांनी दुष्काळ स्थितीचे भान ठेवुन आपल्या कार्यकर्त्यावर खर्चाचा भार येऊ दिला नाही. वाढदिवसापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करणे हे गरजेचे आहे. हा विचार समोर ठेऊन युवा शक्तीप्रतिष्ठाननेही वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत इतर उपक्रम राबविले.
     तरी या सर्व सामाज उपयोगी कार्यक्रमास तालुक्यातील व पांगरी पंचायत समिती गणातील, पंचक्रोशीतील, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी युवा शक्ती प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment