तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

सेनगाव भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:- भाजपा विद्यार्थी आघाडी सेनगाव तालुकाध्यक्ष नितीन माने-पाटील यांनी भाजप केंद्रात व राज्यात सत्तेत असुन ही सर्वसामान्य जनतेची कोनतीच कामे होत नसल्याच्या कारणावरुन दि.12 आक्टोबर शुक्रवार रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नितीन माने-पाटील हे दाताडा येथील रहीवाशी असुन भाजपाच्या पडत्या काळापासुन भाजपचे सक्रीय कार्यकर्त्य म्हणुन  विविध आदोंलने,रास्तारोको मध्ये सहभागी होऊन भाजप वाढीसाठी प्रयत्न केले.याच कार्यातुन त्यांना एक वर्षापुर्वी भाजपा विद्यार्थी आघाडी सेनगाव तालुकाध्यक्ष पदी बसविण्यात आले होते.परंतु भाजपाची केंद्रात व राज्यात सत्ता असतांना ही सर्वसामान्य जनतेचे कामे होत नाहीत व भाजपाचा पदाधिकारी असुन ही दाताडा येथे डिपी जळाली ती त्वरीत उपलब्ध होत नाही.सर्वसामान्य जनतेच्या अडचणी जर भाजपाचे विद्यमान आमदार सोडवु शकत नाहीत तर भाजपात राहुन काय फायदा? म्हणुनच मी शिवसेनेत प्रवेश घेतला अशी प्रतिक्रीया नितीन माने-पाटील यांनी दिली. सध्या मीच शिवसेनेत प्रवेश घेतला असुन लवकरच एक जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम घेणार असुन या कार्यक्रमात असंख्य भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहीती ही माने-पाटील यांनी दिली आहे.यावेळी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,सेनगाव शिवसेना व्या.आ.तालुकाप्रमुख शैलेश तोष्णीवाल,उप नगराध्यक्ष प्रविण महाजन,नगरसेवक मंगेश पवार,युवासेनेचे जगदीश गाढवे-पाटील,निखिल देशमुख,वैभव देशमुख,योगेश महाजन,संतोष शिरके आदीसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment