तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

'द पाथवे टू अ सक्सेसफुल लाईफ' पुस्तक युवापिढीला उपयुक्त ठरेल : पद्मश्री डॉ.विजय भटकर


○ डॉ.गुट्टे महाराजांच्या पुस्तकाचे प्रकाशन 

 परळी वै : प्रतिनिधी दि.30/10/2018
आयुष्याचे मर्म जाणून घ्यायचे  असेल तर तुम्हाला शांत स्थितीत प्रवेश करायला शिकले पाहिजे. भगवान गौतम बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा गांधी  यांच्यासारख्या अनेक महान विभूतींना सत्याचा साक्षात्कार गहन अशा शांत स्थितीमध्येच झाला. ‘द पाथवे टू अ सक्सेसफुल लाईफ' (THE PATHWAY TO A SUCCESSFUL LIFE )  हे पुस्तक अशाच शांततेच्या गाभ्यातून जन्माला आलेले आहे. स्वतः ला आलेल्या प्रत्यक्ष अनुभवातून या पुस्तिकेतील मजकूर लिहिला गेला आहे. लेखक  तरुण संत तर आहेतच त्याचबरोबर उच्चशिक्षित पी.एचडी मॅनेजमेंट पर्सन आहेत. त्यामुळे युवापिढीला हे पुस्तक फार उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास नालंदा विद्यापीठाचे कुलपती तथा परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी व्यक्त केला.
माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष  प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ.विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथिल एमआयटी कॅम्पसच्या सभागृहात सोमवारी (दि.29) संत साहित्याचे अभ्यासक तथा श्री सिध्दीविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या   ‘द पाथवे टू अ सक्सेसफुल लाईफ' (THE PATHWAY TO A SUCCESSFUL LIFE ) या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
   यावेळी  माईर्स एमआयटीचे राहुल कराड म्हणाले की, उच्चशिक्षित आणि तरूण अशा डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांचे अध्यात्मिक कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. कमी वयात  अध्यात्मिक, सामाजिक कार्याच्या माध्यमातून  सर्वांना योग्य दिशा देण्याचे काम करत आहे. लेखक डॉ. गुट्टे महाराज यांनी पुस्तक लिहीताना आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमास गिरीश दाते, दिपक आपटे,   मिलिंद पत्रे यांच्यासह  पुणे येथील विश्‍वशांती विद्यापीठाचे सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते. 

□ चौकट
डॉ.गुट्टे महाराज यांची ग्रंथ संपदा 
युवा संत डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी श्री ओंकारेश्वर दर्शन,  शंकराचे बिल्वदल, नऊ महिन्याच्या अनुष्ठानात लिहीलेले श्री गणेश स्तुती, पीएचडी प्रबंधावर आधारीत मुक्ताई जाहली प्रकाश, यशस्वी जिवनाचा मार्ग, संत केदारी महाराज यांची पंचक्रोशीती महत्ती. त्यांच्या साहित्यामध्ये  आता ‘ ‘द पाथवे टू अ सक्सेसफुल लाईफ' हे इग्रंजी भाषेतील पुस्तकाची भर पडली आहे

No comments:

Post a Comment