तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 October 2018

पाथरी शहरातील प्रत्येक प्रभागात मतदार नोंदनी अभियान

प्रतिनिधी
पाथरी:-१ सप्टेबर ते ३१ ऑक्टेबर या कालावधीत सर्वत्र मतदार नोंदनी अभियान राबवले जात असून पाथरी शहरातील प्रत्येक प्रभागात हे अभियान अतिषय प्रभावी पणे राबवण्या साठी नेते पदाधिकारी परिश्रम घेतांना दिसत आहेत.
नगर परिषद पाथरी अंतर्गत बैकार मोहल्ला पाथरी या रहिवाशी क्षेत्रातील १८ वर्ष पूर्ण झालेले पात्रता धारक युवक, युवती, नागरीक यांचे मतदान यादीत नवीन नाव समाविष्ट करून घेण्या साठी नमुना नं. ०६ भरून घेण्यात आले. तसेच नमुना न. ०८ भरून घेण्यात आला. या सहायता कॅम्प च्या यशस्वितते साठी नगर परिषदेच अध्यक्ष नितेश भोरे, माजी नगर अध्यक्ष एम.ए.मोईज मास्टर, स्वच्छता सभापती कलीम अन्सारी तसेच आसिफ , जुबेर, जाकेर, शेख सलीम व मतदान नोंदणी अधीकारी इत्यादी सहायता कॅम्प मध्ये उपस्थित होते.

No comments:

Post a Comment