तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

नागरिकांनी स्वतःची मानसिकता बदलने गरजेचे -पट्टेबहादूर


जांभरून नावजी येथील क्षेत्रीय कार्याचा समारोप

विविध उपक्रम राबऊन विद्यार्थी यांनी केली जणजागृती

वाशिम - येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालय च्या वतीने एम. एस. डब्ल्यू. भाग दोन च्या विद्यार्थी यांनी पाच दिवसाचे शिबीर ग्राम जांभरून नावजी येथे राबविले आहे. हे शिबीर प्रा. पी. एन. संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले आहे . यावेळी समारोपिय कार्यक्रमात बोलतांना विद्यार्थी प्रवीण पट्टेबहादूर म्हणाले की, आम्ही या गावात पाच दिवस सतत विविध विषयावर काम केले आहे. स्वछता अभियान राबविण्यात आले आहे . कलाकार यांच्या मदतीने जणजागृती करण्यात आली आहे,आम्ही वेगवेगळ्या वेशभूशेत भूमिका सादर केल्या. नाटीका सादर करून गावंकरी यांना शौचालय बांधण्याचा सल्ला दिला व त्याचा वापर करण्याला साकडे घातले आहे. म्हणून आम्ही जरी हे कार्य या पाच दिवसाच्या काळात केले तरी काही फरक पडणार नाही. मात्र आपणच गावकरी यांनी आपली मानसिकता आता बदलून पुढे आले पाहिजे असे भावनिक आवाहन विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर यांनी प्रास्ताविक करतांना केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. प.शाळेचे मुख्यद्यापक सोलंके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक रवी सपकाल हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. पी. एन. संधानी  ह्या होत्या.
यावेळी या कार्यक्रमाला विद्यार्थी गोपाल मापारी, वैभव सरकटे, शिवशंकर दळवे,अमोल वाघमारे, प्रमोद हरिमकर, सूरज सावळे, चंद्रकांत अंभोरे, चंद्रकांत चौधरी, अमोल वाढे,कृष्णा साबणे, वैभव खिल्लारे, जावेद बागबान, साईनाथ वाघमारे, अमोल चव्हाण, निलेश राठोड, सूरज जयस्वाल, प्रशांत काळमुंडले, सचिन गोटे, प्रविण पट्टेबहादूर कु,दीपाली जाधव,  प्रज्ञा डोंगरदिवे, आरती आढे, पूजा धुळे, नीलिमा उखलकर. आदी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनेक जणांनी आपले विचार व्यक्त केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment