तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 October 2018

दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या ननंद भावजयीचा तलावात बुडून दुर्दैवीअंत

अंमळनेर येथिल दू:खद घटना
                                                        पिंपळवंडी दि.८(प्रतिनिधी) दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या ननंद भाऊजयीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना अंबेवाडी शिवारात असलेल्या तलावात दिनांक ८/१०/२०१८ सोमवार रोजी दूपारी १२ ते ५ च्या दरम्यान घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, दसरा हा सण काही दिवसावर येऊन ठेपला असुन महिला मंडळी घराची साफसफाई करण्यात व्यस्त आहेत .या वर्षी पावसा अभावि नदी नाले कोरडे ठनठनीत आहेत. त्यातच अंमळनेर येथील काजल बाळु कुऱ्हाडे (१९) आणि कु.सोनाली अशोक कुऱ्हाडे (१५) या दोघी ननंद भावजयी धुणे धुण्यासाठी सकाळी १२ वाजता अंबेवाडी शिवारात व पोलिस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या तलावात  गेल्या होत्या, दरम्यान सायंकाळी ४वाजेपर्यंत त्या घरी न आल्याने अमोल कुऱ्हाडे हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता त्याला तलावात या दोघी तलावात बुडाल्याचे दिसून आले . सदरील घटना कुटुंबातील व्यक्तींना सांगितली. सायंकाळी उशीरापर्यंत प्रेत काढण्याचे काम सुरू होते. पोलीस पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी पाटोदा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवले होते. सदरील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन गरिब  , वडारी समाजातील कुऱ्हाडे कुटुंबाला प्रशासनाने अर्थीक मदत करावी अशी मागणी होत आहे. अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा र. ला १८/१८ प्रमाणे नोंद घेण्यात येऊन कलम १७४ अन्वये अमोल अशोक कुऱ्हाडे यांच्या फिर्यादी वरून अकस्माात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a comment