तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

रेणुका शुगर्सचा बॉयलर अग्नी प्रदिपन संपन्न

किरण घुंबरे पाटील
पाथरी:- देवनांद्रा परिसरातील रेणुका शुगर्स लि.पाथरी चा बॉयलर चे अग्नीप्रदिपन सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे सदस्या जि.प.परभणी व मा.श्री.दादासाहेब टेंगसे माजी सभापती तथा उपाध्यक्ष रा.कॉ.साखर कामगार युनियन मराठवाडा यांच्या हस्ते करण्यात आले.
सेमवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी देवनांद्रा येथे जगदंबा देवीची विधिवत पूजा करून बॉयलर चे अग्निप्रदिपन करण्यात आले.याप्रसंगी  प.स.सदस्य अजय थोरे ,युनिट हेड शिवराज तेली, एचआर पी.एस. वेरुळकर, शेतकी अधिकारी पि.आर. पाटील, प्रोसेस चिफ केमिस्ट उमाकांत पौळ,स्टोअर किपर अनिल चौगुले,परम अवचार, रा.कॉ. मराठवाडा साखर कामगार युनियन चे सचिव शिवाजीराव शिंदे,कोषाध्यक्ष अशोक डासाळकर,सदस्य कल्याण देशमुख, बी.बी. म्हेत्रे, उद्धवराव नखाते,आर. एन. केंदळे, म.अदिल म.खाजा, एन.के. गायकवाड, एन.पी. आंबट, सेक्युरिटी ऑफिसर सोळंके व सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते

1 comment: