तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

बोरगावात शॉर्ट सर्किटने सहा एक्कर ऊस जळुण खाक

किरण घुंबरे पाटील
पाथरी : तालुक्यात विजेच्या शॉर्ट सर्किटने उस जळण्याचे सत्र सुरूच असून पोहेटाकळी, रेणाखळी, झरी या गावांतील उस जळून शेतक-यांच नुकसान झाल्याच्या घटना ताज्या असतांनाच आज रविवार १४ ऑक्टोबर रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास इंगळे बोरगांव येथील बाबासाहेब इंगळे, हरिभाऊ इंगळे या दोन शेतक-यांचा सहा एक्कर ऊसाचे पिकं जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

या विषयी शेतक-यां कडून मिळालेली माहिती अशी की,पाथरी सेलू रस्त्या लगत बाबासाहेब इंगळे, हरिभाऊ इंगळे यांच्या शेतातील असाला विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे लक्षात येताच झरी,गव्हाण,दहेगाव खेडूळा येथील नागरीकांनी उसाच्या शेताकडे धाव घेतली. या वेळी पाथरी न प चा अग्निशमन बंब बोलावण्यात आला मात्र या शेतात जाण्या साठी रस्ता नसल्याने बंब तेथपर्यंत पोहचू शकला नसल्याने उपस्थित नागरीकांनी आग विझवण्या साठी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग सर्व प्रथम बाबासाहेब इंगळे यांच्या उसाला लागली त्यांचा दोन एक्कर उस जळाला या नंतर ही आग वाढत जात हरिभाऊ इंगळे यांच्या शेतातील उसाला लागली यात त्यांचा चार एक्कर उस जळून खाक झाला असून यात लाखोंचे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी इतर शेतक-यांचा पंचविस एक्कर उसाचे क्षेत्र असून शेत रस्त्या वरून दिसत असल्याने ये जा करणारी विविध गांवची मंडळी तिकडे धावली आणि आग आटोक्यात आणली अन्यथा संपुर्ण परीसरातील उस जळाला असता. असे येथील उपस्थित असलेल्या नागरीकांनी सांगितले.
आग लागल्याचे कळताच पाथरी येथील अग्निशमन दलाचे बंब घटना स्थळी वेळीच पोहोचले परंतु पुढे शेतात जाण्या साठी रस्ता नसल्याने काही करता आले नाही इंगळे बोरगांव येथील ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात न आल्याने दोन शेतक-यांचा सहा एक्कर उभा ऊस जळुण खाक झालाअग्निशमन दलाचे जवान चालक शेख शेरु,फायरमैन शारेख खान फायरमैन बळीराम गवंडे यांनी अथक परिश्र घेतले.

दरम्यान हरीभाऊ इंगळे यांचे बंधू बाळासाहेब इंगळे यांना हे दृष्य पाहून भोवळ आल्याने त्यांना साडे पाच च्या सुमारास ग्रामस्थांनी पाथरी येथील शासकिय रुग्नालयात दाखल करण्यात आले होते उपचारा नंतर साडे सात वाजता ते गावाकडे परत आले असल्याची माहिती बोरगाव ग्रामस्थांनी दिली.

No comments:

Post a Comment