तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

बॅंकेतून नव्हे, परगावातून पिक कर्ज केले जाते खात्यात जमा


सिरसाळच्या ग्रामीण बॅंक व्यावस्थपकांचा प्रताप

सिरसाळा प्रतिनिधी  : ज्या बॅंक शाखेची कर्ज फाईल आहे त्याच बॅंक शाखेतून संबधीतांच्या खात्यात कर्ज रक्कम टाकायला हवी परंतु असे न करता सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंक चे मॅनेजर महाशय परगावातून पिक कर्ज व्यावहार करत आहेत. याच मुळे दलाल डाव साधून घेत आहेत. सुरुवातीस पिक कर्ज फाईल बॅंकेतच घेण्यात आल्या मात्र काही दिवसांनी गावा गावात निर्माण झालेले बॅंकेचे /बॅंकेतील  दलाल फाईल घेऊ लागले आणि थेट परळी ला जाऊन मॅनेजर महाशयांना देऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे पिक कर्जा चे कागदपत्रे बॅंकेत जमा केल्यास फाईल टाईप करणे/ सेट करणे हे बॅंकेचे कर्तव्य आहे तेही मोफत तरीपण शेतक-यांना फाईल साठी रुपये ५०० /- मोजावे लागले .  यात दलालांची खुप चंगळ झाली. फाईल मागे १० % कमिशन फिक्स आणि ५०० रपये अलगद . दोन महिण्या पासुन सुरु असलेल्या पिक कर्ज प्रकरणा दरम्यान दलालांनी लाखो कमावले, शेतकरी लुटल्या गेला. याला सर्वस्वी जबाबदार शाखा व्यावस्थपकांचा बेजाबादार, ढिसाळ कारभार होय. शेतक-यांचे पिक कर्ज प्रकरण गांभीर्याने न घेतल्या मुळे आणि याकडे नियोजन बद्ध पध्दतीने लक्ष न दिल्याने हि परिस्थिती निर्माण झाली. यात महत्त्वाचे म्हणजे पिक कर्ज रक्कम बॅंकेतून खात्यात जमा न  करता परगावातून कारभार केला. याचा अधिक  फायदा दलालांनी घेतला आणि शेतकरी लुटल्या गेला. असे समजते आहे.

                 शेतकरी थेट जिल्ह्याधिका-यांना भेटले  :-             
            महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत सामान्य शेतक-यांची बेबाकी च्या नावाने होत असलेली अडवणूक, अरेरावी, अहवेलना, दलालांची उद्धट वागणूक  आणि होत असलेला गैर कारभार या संदर्भात हिवरा गावचे शेतकरी काल मंगळवारी थेट जिल्हाधिकारी यांना भेटले व सविस्तर प्रकार सांगितला.

No comments:

Post a Comment