तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

हाळम फेस्टिव्हल मध्ये जि.प.सदस्य अजय मुंडे यांच्या हस्ते देवीच्या मुुर्तीची प्रतिष्ठापणा 


देवी माता, सरकारला दुष्काळ जाहिर करण्याची सद्बुध्दी दे-जि.प.सदस्य अजय मुंडे यांचे साकडे 
........................
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  तालुक्यातील मौजे हाळम येथे हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गोेत्सवाचे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अयोजन करण्यात आले आहे.   या फेस्टिव्हलचे उद्घाटन व देवीची मुर्तीची प्रतिष्ठापना बीड जिल्हा परिषदेचे सदस्य अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच आरती ही करण्यात आली. याप्रसंगी हाळम पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष माधव मुंडे व पदाधिकारी यांनी जि.प.सदस्य अजय मुंडे यांचा शाल व श्रीफळ, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. हे देवी माता सरकारला दुष्काळ जाहिर करण्याची सद्बुध्दी दे असे साकडे यावेळी जि.प.सदस्य अजय मुंडे यांनी देवी मातेकडे घातले. 
     हाळम येथे हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुगोत्सवाचे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अयोजन करण्यात आले आहे. यावेळी जि.प.सदस्य अजय मुंडे म्हणाले की, ग्रामिण भागात हाळम फेस्टिव्हलचा उपक्रम अनुकरणीय आहे. त्याबद्दल संयोजकाचे कौतुकच करायला पाहिजे. दुर्गोत्सवमुळे शक्ती वाढते. या शक्तीचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले. 
    यावेळी देवनाथ दहिफळे, माणिकराव दहिफळे, मंचकराव गुट्टे, हरिश्‍चंद्र महाराज गुट्टे, माणिक गित्ते, लिंबाजी दहिफळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव गुट्टे, सचिव सोमनाथ गित्ते, जगन्नाथ मुंडे, नंदकुमार पेंटुळे, अजय गित्ते, गणेश दहिफळे, सतिश होळंबे, मनोज गित्ते, सिध्देश्‍वर दहिफळे, दिनेश दहिफळे, वैजनाथ मुंडे उध्दव मुंडे, सुबोध दहिफळे, कृष्णा दहिफळे, संभाजी पेंटुळे, कैलास पेंटुळे, अमोल गुट्टे, आदि पदाधिकारी व हाळम ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परमेश्‍वर लांडगे यांनी केले तर आभार माधव मुंडे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment