तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

गेवराई तालुक्यातील शेतकरी पेमेंटसाठी झिजवताहेत उंबरे..

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २९ __ तालुक्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शासनाने खरेदी केलेल्या ३५ हजार क्विंटल तुरीचे ५ कोटी ७० लाख आणि ९ हजार क्विंटल हरभर्‍याचे २ कोटी ७४ लाख रुपये अद्याप वाटप झालेले नाही. शेतकरी थकीत पेमेंटसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवत आहेत.
सन २०१७-१८ च्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गेवराई येथे सब एजंट संस्थेकडून तूर आणि हरभरा खरेदी करण्यात आली होती. त्या काळात तालुक्यातील शेतकर्‍यांची तुर आणि हरभर्‍याची खरेदी शासनाने मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. नाफेडच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ऑनलाईन प्रक्रिया कोलमडली. त्यावेळी सबएजंट संस्थेने ऑफलाईन पध्दतीने धान्य खरेदी केले. शासनाने अचानक धोरणात बदल करून ऑफलाईन पध्दतीने खरेदी केलेली तुर शेतकर्‍यांना परत करण्याचा अजब निर्णय केला. शासनाच्या अशा तुघलकी धोरणामुळे शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे पेमेंट अदा झालेले नाहीत. दुष्काळग्रस्त गोरगरीब शेतकरी थकीत पेमेंट मिळावे म्हणून विविध कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र सबएजंट संस्था, मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने या शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
यावर्षी क्रिएटीव्ह शेतकरी प्रा.लि. या खाजगी संस्थेला गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी स्थित खाजगी बाजार समितीच्या आवारात शासकीय धान्य खरेदी केंद्र चालविण्याची परवानगी मिळाली असली तरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मागील वर्षीचे थकीत पेमेंट अदा करण्याची जोरदार मागणी केली आहे. निवेदनावर सचिन शिंदे, अशोक नाईकवाडे, बळीराम यादव, मदन काळे, सुधाकर हाकाळे, तात्यासाहेब शेंबडे, अंकुश पालेकर यांच्यासह इतर शेतकर्‍यांनी बाबतचे निवेदन शेतकर्‍यांनी शासनाला दिले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment