तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

शम्स जालनवी यांच्या हस्ते भाषा आणि वाड:मय मंडळाचे उदघाटन

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि.११ __ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय गेवराई येथे ज्येष्ठ शायर शम्स जालनवी यांच्या हस्ते भाषा आणि वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पाली भाषा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
       महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन जाणिवा समृद्ध होण्यासाठी दरवर्षी भाषा आणि वाङ्मय मंडळाची कार्यकारिणी गठीत केल्या जाते. या कार्यकारिणीत प्रामुख्याने साहित्यिक अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. या वर्षीच्या भाषा आणि वाङ्मय मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी कवयित्री कु. दीक्षा सावंत, उपाध्यक्ष कु. आम्रपाली उदावंत, सचिव शेख फरहीन, सहसचिव शिवम देवकते, निमंत्रक रोहन पंडित, सहनिमंत्रक शितल खराद तर सदस्य म्हणून सुरज कादे, सत्यसाई महामुनी, हनुमान गिरी, अश्विनी कांबळे आणि अमोल पवार यांची निवड करण्यात आली. चारही भाषेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी विविध विषयांवर भित्तीपत्रके बनवून त्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले. उद्घाटक तथा शायर शम्स जालनवी यांनी एकाहून एक सरस गझल पेश करून विद्यार्थी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या “सबको मन की बात बताना ठीक नही”, " जर्द जर्द चेहेरे है” या गझलांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. भाषा आणि वाङ्मय समिती प्रमुख डॉ. समाधान इंगळे यांनी समारंभाचे प्रास्ताविक केले. प्रा. संतोष नागरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. अरुण जाधव यांनी कार्यकारणीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर विजय सांगळे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना, नवनियुक्त कार्यकारिणीचे व कल्पक भित्ती पत्रकांचे अभिनंदन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुरेश पाटील यांनी केले तर आभार प्रा.लिमसे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. विजयकुमार बांदल, डॉ. संदीप बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती. समिती सदस्य प्रा. भाग्यश्री पवार, प्रा. हर्षवर्धन इंगळे, प्रा. शरद सदाफुले, प्रा. ठोसर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी मोठय़ा संख्येने प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

╭ ▌▌╮
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment