तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या आईची जिवंत जाळुन हत्या

मंगरुळपीर येथे घडला धक्कादायक प्रकार

मंगरुळपीर-जन्मदात्या आईलाच पोटच्या मुलाने विळ्याने वार करुन नंतर जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन पोलिसांनी मुलाला शिताफीने जेरबंद केले आहे.
मंगरुळपीर नजीकच असलेल्या मुर्तीजापुर(पंचशिलनगर)येथे अतुल गावंडे नामक मुलाने आपल्याच जन्मदात्या आईला विळ्याने सपासप वार करुन नंतर जिवंत जाळल्याची घटना दि.३१ आक्टोबर च्या मध्यराञी अंदाजे अडिच वाजता घडली असुन या प्रकारानंतर मुलगा पळून गेला होता परंतु पोलिसांनी अतुल गावंडे यास जेरबंद केले आहे.झोपेत असलेल्या आईवर विळ्याने वार करुन जिवंत जाळल्याने पत्नी जागी झाली तिने सासूला वाचविन्याचा प्रयत्न केला परंतु तिच्यावरही विळ्याने वार करुन मारहाण केली.आवाजाने वहिणी जागी झाल्याने तिने मदतीसाठी आरडाओरड केला.आवाज ऐकुन परिसरातले लोक जागे झाले परंतु तोपर्यत आईचा कोळसा झाला होता.पोलिसांना घटनेची माहीती कळताच घटनास्थळी जावुन माहीती घेतली.या प्रकारानंतर अतुल गावंडे पसार झाला परंतु शिताफीने पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जेरबंद केले असुन वृत्त लीहेपर्यत गुन्हे दाखल करन्याचि प्रक्रिया सुरु होती.सदर मुलगा मनोरुग्न असल्याचे बोलल्या जात आहे.पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment