तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

महाराष्ट्रातील लोडशेडिंगच्या संकटाला ऊर्जा खात्याचे मंत्री जबाबदार – नवाब मलिक


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
दि.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सल्लागार विश्वास पाठक यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्यात अघोषित लोडशेडिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जनतेला १२ तास लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. कोणतेही नियोजन वा अमलबजावणी नसल्याने हे घडत आहे. ज्यांना ऊर्जा क्षेत्रातील काही कळत नाही अशा व्यक्तींकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून सल्लागार विश्वास पाठक आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्वरित हकालपट्टी करावी, नाहीतर ते ऊर्जा विभागाचे आणखी नुकसान करतील, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. कोळसा मंत्रालयाचे मंत्री पियूष गोयल यांनी ते महाराष्ट्राला कोळसा कसा पुरवणार आहेत, ते स्पष्ट करावे,  तसेच भाजपने ब्लू प्रिंट काढावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात १२-१२ तास लोडशेडिंग आहे. सरकारने लोडशेडिंगचा कार्यक्रम जाहीर करावा. सरकार तसे न करता अघोषित लोडशेडिंग करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. ९ तारखेला उर्जा खात्याने नोट तयार केली आहे. त्यात ऊर्जेची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे आणि ३००० मेगावॅट वीजेची भीषणता जाणवत आहे, असेही ते म्हणाले.
सरकारने जनतेला अडचणीत आणत आहे. राजकीयदृष्ट्या हे केलं जात आहे. पॉवर प्रोजेक्टला कोळसा मिळत नाही म्हणून वीजेचा तुटवडा जाणत आहे. देशाचे उर्जा मंत्री म्हणतात कोळशाचा तुटवडा नाही. मग वीज का मिळत नाही? सरकारने मान्य करावे की, देशात कोळशाचा तुटवडा आहे. तुटवडा होता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागाला महाराष्ट्राची वीज दिली गेली. तिथे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने हा डाव केला, याचा भुर्दंड महाराष्ट्रातील जनतेला भोगावा लागत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते की गुजरात सोडलं तर मला सगळीकडे अंधार दिसतो, महाराष्ट्राला अंधारात लोटायचे सरकारचे हे कारस्थान आहे का, असा सवाल त्यांनी केला.
विश्वास पाठक यांना ४ कंपन्यांवर डायरेक्टर म्हणून नेमले गेले. आधी तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये ते प्रिंटींग विभागात काम करत होते. विश्वास पाठक यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आल्याने ही वेळ आली, ज्यांना या क्षेत्रात काही कळत नाही अशा विश्वास पाठक यांना सल्लागार बनवले. राज्याचे ऊर्जामंत्री आणि पाठक यांनी हकालपट्टी करावी अन्यथा हे ऊर्जा विभागाचं आणखी वाटोळं करतील, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment