तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

परळीतील बाहयवळण रस्त्याचे काम लवकरच होणार सुरू


ना. पंकजाताई मुंडे यांच्या सुचनेनुसार अधिका-यांनी घेतला बैठकीत आढावा

परळी दि. ०९---- परळी बाहयवळण रस्त्याच्या भूसंपादनाचे काम पूर्ण होत आले असून लवकरच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार उप विभागीय अधिका-यांनी आज बैठक घेवून त्यात कामाचा आढावा घेतला.

परळी बाहयवळण रस्ता हा जिरेवाडी -ब्रह्मवाडी ते टोकवाडी मार्गे परळी बीड रस्त्याला जोडला जाणार आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे . सदर रस्ता  हा जवळपास चार किमी लांबीचा असून यात ११.६१ हेक्टर जमीन संपादित होत आहे. त्या पैकी ९० टक्के जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले असून ५९ टक्के  शेतक-यांना या संपादित जमिनीचा  मावेजा वाटप झालेला आहे. या बाबत अंतिम संपादनाची प्रक्रिया चालू आहे. या संदर्भात संपादन संघ , महसूल व भूमिअभिलेख यांचे द्वारे अंतिम संयुक्त पाहणी करण्यात आली आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या सूचना
--------------------------------
बाहयवळण रस्त्याचा प्रश्न परळी शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या कामातील सर्व कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करून काम तातडीने सुरू करावे अशा सूचना ना. पंकजाताई मुंडे यांनी नुकत्याच जिल्हाधिकारी व उप  विभागीय अधिका-यांना दिल्या होत्या. त्यानंतर अधिका-यांनी बैठक घेवून सदर काम वेगाने सुरू करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

  सदरील रस्त्यामुळे शहरातील अवजड वाहने व इतर ट्राफिक कमी होण्याबरोबरच शहराच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल.शहराच्या विकासाला या रस्त्यामुळे चालना मिळेल, दळणवळण सुलभ होईल, प्रदूषण तसेच वाहतूकीची समस्या देखील  आटोक्यात येणार आहे.
••••

No comments:

Post a comment