तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

बद्रीनाथ येथील संकटग्रस्तांना अभय चाटेंनी दिला मदतीचा हात

परभणी
मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट त्यासोबतच खचलेला रस्ता अशा भीषण स्थितीत जीव मुठीत धरून परमेश्वराचा धावा करणार्‍या भाविकांना आता यापुढे आपलं जगणं शक्य नाही अशी भिती मनात असतानाच भाविकांना एका माणसाने केलेल्या सहकार्यामुळे जीवदान मिळाले असंच म्हणावं लागेल. या माणसाचं नाव अभय चाटे.
परभणी येथील 44 भाविकांचा जत्थ्लृा 18 सप्टेंबर रोजी बद्रीनाथ आणि केदारनाथ  यात्रेसाठी परभणी येथून रवाना झाला होता. पैठण येथील ह.भ.प.अंकुश महाराज पानखडे आणि परभणीतील आयोजक नामदेव चुडावेकर यांच्यासह इतर भाविकांचा यामध्ये समावेश होता. बद्रीनाथ येथील देवदर्शन करून भाविक 22 सप्टेंबर रोजी केदारनाथच्या दर्शनाला निघाले. दर्शन करून काहीजण पायथ्याकडे आले. गौरीकुंड ते केदारनाथ्लृ हा 16 किलोमीटरचा अंतराचा भाग काहीजण पार करून पायथ्याशी आले होते. मात्र अचानक हवामानात बदल झाला आणि मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट सुरु झाला. त्याच दरम्यान मार्गावरील रस्ता खचला. अशा स्थ्लिृतीत काय करावं हे भाविकांना कळेनासे झाले. काही भाविक वरच्या  बाजूला सरकले. त्यामुळे काय करावे काही सुचेनासे झाले. आयोजक नामदेवराव चुडावेकर  यांनी परभणीतील अनेकांना मदतीसाठी दूरध्वनी, भ्रमणध्वनी वरून संवाद साधला. मात्र अडचणीत असताना कोणीच मदत करत नाही या म्हणीची प्रचिती चुडावेकर यांना आली. मात्र याच दरम्यान पालम येथ्लृील एका कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांना या सर्व  घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच अभय चाटे यांनी तात्काळ मुंबई व नंतर थ्लृेट दिल्लीपर्यंत दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी करून आपल्या मित्र परिवारांना यासंदर्भात माहिती दिली. या कामात उत्तरप्रदेशचे ग्रामविकास मंत्री डॉ.महेंद्र सिंह, भाजपाचे केंद्रीय कार्यालय मंत्री शाम जाजू, मुख्यमंत्री कार्यालयातील श्रीकांत भारतीय, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांचे सहकार्य लाभले. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे तात्काळ यंत्रणा कामाला लागली आणि सैन्य दलातील सैनिकांनी तात्काळ बद्रीनाथ्लृ येथ्लृील संकटात अडकलेल्या भाविकांना रुग्णसेवा निवारा आणि इतर मदत करून परतीच्या प्रवासासाठी सुखरूप रवाना केले. परभणी येेथ्लृे पोहोचल्यावर ह.भ.प.अंकुश महाराज पानखडे आणि आयोजक नामदेव चुडावेकर, अंकुश दुधाटे, माधव दुधे, दत्ता दुधे, राधा चुडावेकर, बाळासाहेब भोपाळे, विठ्ठल गिराम यांच्यासह इतर भाविकांनी आपल्याला केलेल्या मदतीच्या संदर्भामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या निवासस्थ्लृानी जावून त्यांची भेट घेतली. अभय चाटे आणि सविताताई चाटे यांचा छोटेखानी सत्कार करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र अभय चाटे यांनीच या सर्वांना आपण सुखरूप परत आलात त्याबद्दल त्यांचा सत्कार केला. देव आम्ही पाहिला नाही, मात्र अभयभाऊच्या रूपाने देवमाणूस आज पाहिला अशी प्रतिक्रिया भाविकांनी याप्रसंगी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment