तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 October 2018

श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींची राज्य पातळीवर निवड

अंबाजोगाई (०९ )दि. ८ ऑक्टोबर रोजी जालना येथे झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींनी बाजी मारली असून या विजयी  मुली आता राज्यस्तरावर विभागाचे नेतृत्व करणार आहेत.
  या यशस्वी मुलींमध्ये कु.साक्षी थाटकर ८०मीटर अडथळा प्रथम, १०० मीटर धावने द्वितीय,
२०० मीटर धावने द्वितीय, ४x१०० प्रथम ,कु. ऋतुजा  केंद्रे ४x१०o रिले प्रथम,  कु.यशश्री फड ४x१०oरिले, कु.वैष्णवी भारजकर ४x१०o रिले प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
     या घवघवित यशाबद्दल या यशस्वी मुलींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री.विजय बेंडसूरे व श्री.शाम वारकड यांचे अभिनंदन भा.शि.प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री.सुरेंद्र आलुरकर,कार्यवाह श्री. नितीन शेटे,  स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्री.किशोर गिरवलकर,स्थानिक कार्यवाह श्री.बिपीन क्षिरसागर,शालेय समिती अध्यक्ष प्रा.श्री. शशिकांत टेकाळे,मुख्याध्यापिका सौ.सुनंदा धर्मपात्रे , उपमुख्याध्यापक श्री.प्रभाकर वाघमारे ,पर्यवेक्षक श्री.अरूण पत्की सर्व शिक्षक बंधुभगीनी कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन  केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment