तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 October 2018

परळीतील बस वाहक गित्ते व चालक सानप यांचा प्रमाणिकपणा


परळी-बीड मध्ये सापडलेले 1 लाख 40 हजार
प्रवाशांस केले परत

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
    परळी आगारातुन बीडकडे निघालेल्या बसमध्ये एका प्रवाशांची 1 लाख 40 हजाराची राहिलेली पिशवी प्रवाशांस सापडली नाही. तो प्रवासी बीड मध्ये उतरला त्यानंतर बस वाहकास बसमध्ये पिशवी आढळुन आली. या पिशवीत 1 लाख 40 हजाराची रक्कम होती. ती रक्कम  बस वाहक व चालकांनी संबधीत प्रवाशांस परत केली. बस वाहक विश्‍वनाथ गित्ते व चालक जी.एम.सानप यांचा परळी बस आगार प्रमुख आर.बी.राजपुत व परळीचे उपनगराध्यक्ष आयुब पठाण यांच्या हस्ते परळी बसस्थानकात बुधवारी सत्कार करण्यात आला.
    बीड येथील बालेपीर भागातील सय्यद पाशामियाँ हे त्यांचे परळीतील जावाई नसीर काजी यांच्याकडे आले होते. परळीत प्लॉट घेण्यासाठी त्यांनी 1 लाख 40 हजार रुपये आणले होते. परंतु प्लॉट न घेतला ती रक्कम घेऊन बुधवारी सकाळी परळी-बीड एम.एच.20 बी.टू.2028 या क्रमांकाच्या बसने बीडकडे निघाले बीडच्या बसस्थानकात उत्तरल्यास बसमध्ये पैशाची पिशवी राहिल्याचे लक्षात आले. पुन्हा बसमध्ये चढुन पहिले असता. त्यांना पिशवी दिसली नाही. बीडच्या एसटी कंट्रोलरला माहिती देण्यात आली. दरम्यान बीडहुन बस परळीकडे येण्यास निघाली असता. बस वाहकाचे लक्ष बसमधील पिशवीकडे गेले. पिशवी उघडुन पाहिली असता त्यामध्ये 1 लाख 40 हजाराची रक्कम आढळुन आली. ती रक्कम परळीत आल्यानंतर सय्यद पाशामियाँ यांचे जवाई नसीर काजी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी त्यांचे इतर नातेवाईक उपस्थित होते.
    बस वाहक विश्‍वनाथ उर्फ आबा गित्ते रा.नंदागौळ , ता.परळी वैजनाथ,जि.बीड व बस चालक जी.एम.सानप यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल एस.टी.महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांचे कौतुक केले आहे. आगार प्रमुख आर.बी.राजपुत, उपनगराध्यक्ष आयुब पठाण, राजाभाऊ ठोंबरे, रमेश गित्ते, उत्तम मोरे, उमाकांत मुंडे, मनोज बेंबळगे, आर.एन.गित्ते, सचिन राठोड, कुणाल गोदाम यांच्यासह इतरांनी गित्ते व सानप यांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment