तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

पातूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा , भारिप बहुजन महासंघाचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन

_______________________________________________

निलेश किरतकार
मो.नं. 9665382780
अकोला :- अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने पातूरात मोर्चा काढण्यात आला. तसेच आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांना विविध मागण्यांचे निवेदन 27 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
      शहरातील संभाजी चौकापासून तर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये भारिप बहुजन महासंघाचे पातूर तालुका महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने 32 जिल्ह्यातील 201 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत; परंतु यामधून पातूर तालुका जाणीवपूर्वक वगळण्यात  आला आहे. त्यामुळे पातूर तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीत सापडला आहे. पातूर तालुक्याचा दुष्काळग्रस्ताच्या यादीत समावेश करावा, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, नाफेडचे सन 2017-18 चे तूर व हरभरा यांचे चुकारे तात्काळ देण्यात यावे, हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्यात यावी, पिक विमा लागू करण्यात यावा, आदींसह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
       या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाने दिला आहे. निवेदनावर भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, आमदार बळीराम सिरस्कार, अकोला जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे,  ज्ञानेश्वर सुलताने, दिपक गवई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.प्रभाताई सिरसाट, अँड.किरण सदार, सुनिल फाटकर, दिपक धाडसे, प्रमोद देशमुख यांसह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment