तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 October 2018

शोभायात्रा, पोवाडा व व्याख्यानाने जीवा महाला यांची जयंती साजरी

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १४ __ शुरवीर जिवा महाले यांची जयंती उत्सव सोहळा मंगळवार, दि. ९ रोजी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. शहरातील मिरवणूक मार्गावरून निघालेली शोभायात्रा, शाहीर कल्याण काळे व ज्ञानदेव काशीद यांनी सादर केलेल्या पोवाडा व व्याख्यानाने जयंती उत्सवात रंगत आणली.
      सदरील उत्सव महाराष्ट्र नाभीक कर्मचारी महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष उत्तमराव सोलाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्सव यशस्वीपणे पार पडला. शिवरत्न नरवीर जिवाजी महाला यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता सोलाने साहेब यांच्या निवासस्थाना पासून श्री व सौ. कुंदाताई उत्तमराव सोलाने यांनी जिवा महाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिकांनी जीवा महाला यांना अभिवादन करून पुष्पवृष्टी केली. शोभायात्रा संत सेना महाराज यांच्या मंदिरात विसर्जित झाली. उर्वरित कार्यक्रम महात्मा फुले सिटी सेंटर सभागृहात संपन्न झाला. येथे आयोजित करण्यात आलेल्या विचारपिठावर माजीमंत्री बदामराव पंडीत, माजी आमदार अमरसिंह पंडित, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे  प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी  मंडळाचे प्रदेशााध्यक्ष उत्तमराव सोलाने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र राक्षसभूवनकर, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, रिपाइंचे अध्यक्ष किशोर कांडेकर ,युवराज शिंदे, गुलाब चव्हाण, वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड, प्रकाश कानगावकर , किशोर शिंदे, श्रीनिवास बेद्रे, धम्मपाल कांडेकर, अमोल मस्के, विकास काळे, राऊत, व्याख्याते शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद, शिवशाहीर कल्याण काळे  यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, थोर महापुरुषांचे विचार समाजाला मार्गदर्शक असतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व त्यांचे आदर्श प्रत्येक माणसाला प्रेरणा देत राहतात, मात्र असे उत्सव सार्वजनिक व कोणत्याही गटातटाचे न राहता साजरे केले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेवराई शहरात पहिल्यांदाच असा आदर्श उपक्रम व जयंती उत्सव साजरा केला जात असल्याने, या उपक्रमाला सार्वजनिक स्वरूप येऊन, आपल्या प्राणांची बाजी लावणारे जीवा महाला यांचे जीवन चरीत्र तळागळातील जनतेला माहिती व्हावे असे आवाहन ज्ञानदेव काशीद यांनी करून, जीवा महाला यांचे यांचे योगदान इतिहासात अजरामर राहील असे प्रतिपादन त्यांनी केले. शाहीर काळे  यांनी आपल्या तडाखेबंद शाहीरीतून जीवा महाला यांच्या जीवन चरित्राची गाथा उलगडून दाखविली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी जीवा महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना सोलाने यांनी सांगितले की, समाज बांधवांनी या निमित्ताने एकत्र येऊन, आपल्या विचाराची देवाणघेवाण करावी व थोर महापुरुष, संत यांच्या विचाराची शिदोरी नव्या पिढीला माहीत झाली पाहिजे, हा प्रमाणीक उद्देश या जयंती उत्सवाच्या मागे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सुत्र संचलन महादेव चाटे यांनी करून, आभार बंडू भाऊ सोनवणे यांनी मानले.
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत उत्सव समितीचे अध्यक्ष कमलेश ( गोटू ) वाघमारे, स्वप्नील राऊत, अंकुश खंडागळे, अशोक वखरे, पांडुरंग गोरे, उपाध्यक्ष हरी ओम पंडीत, सुरेशभाऊ काशीद, कैलास खंडागळे, साईनाथ सुरवसे, अहिलाजी काळे, शाळीग्राम काळे, शिवाजी वाघमारे, लक्ष्‍मण वाघमारे, भगवान सोनवणे, सरपंच रमेश राऊत, सुनील राऊत, विशाल सरडे, भगवान काशीद, अंकुश खंडागळे, मधुकर गोरे, शिवाजी कोकणे, रवी खंडागळे, बाळासाहेब छडीदास, विठ्ठल राऊत, गोवर्धन काशीद, रवींद्र वखरे, लक्ष्मण वाघमारे, शिवाजी वाघमारे, शंकरराव पंडित यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केले.

╭ ▌▌╮
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment