तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

रामायणाचार्य ह.भ.प.श्री. प्रशांत महाराज चव्हाण व बन गुरूजी यांचा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षांच्या हस्ते सत्कार


परळी वैजनाथ दि. 07 (प्रतिनिधी) : रामायणाचार्य तथा महाराष्ट्रातील प्रसिध्द भागवतकार ह.भ.प. प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर यांचा व लातूर जिल्हा वृध्द कलावंत मानधन निवड कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. बन गुरूजी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सऱ्हृदय सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा संगीत अलंकार ह.भ.प. श्री. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने करण्यात आलेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संगमचे पोलीस पाटील पांडूरंगजी रोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडाळाचे परळीचे शहराध्यक्ष अशोक महाराज कराळे हे होते.
नुकतीच लातूर जिल्हा वृध्द कलावंत कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. बन गुरूजी व प्रशांत महाराज चव्हाण यांनी नुकतीच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विभागीय कार्यालयास सदीच्छा भेट दिली असता. मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांनी लातूर जिल्हा वृध्द कलावंत कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. बन गुरूजी यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवून लातुर जिल्ह्यातील खऱ्या वृध्द कलावंतांना न्याय देण्या बाबत सहकार्य करण्याचे अवाहन केले. तसेच ह.भ.प. प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर यांच्या भागवत कथा महाराष्ट्रा बाहेर सुध्दा होतात.
या वेळी सत्कारास उत्तर देतांना लातूर जिल्हा वृध्द कलावंत कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. बन गुरूजी म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील वृध्द कलावंतांची महाराष्ट्र शासनाच्या मानधना करता निवड ही निरपेक्ष कसलाही भेदभाव न करता, सर्व सामान्य व गरजु कलावंतांना न्याय देण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न करील.
तसेच  रामायणाचार्य तथा महाराष्ट्रातील प्रसिध्द भागवतकार ह.भ.प. प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या पावन भूमीत अखिल भारतीय वारकरी मंडाळाच्या वतीने करण्यात येणारा सत्कार हे आमचे भाग्य असून आमचे कार्य यापुढे ही आम्ही असे अविरत चालू ठेवू.
या कार्यक्रमास अखिल भारतीय वारकरी मंडाळाचे आशोक महाराज कराळे, सुरेश मोगरे, ज्ञानेश्वर महाराज कतारे, अर्जुन फड गोपाळवाडीकर, रूक्षराज महाराज आंधळे, तुळशीदास सुर्यवंशी, वसुदेव महाराज मुंढे-शास्ञी गोपीनाथगडकर, विकास शिंदे, डॉ. माणिक कांबळे, नरसिंग गायकवाड, नवनाथ जोगदंड, सचिन फड,  राम लोखंडे, महशे शिंदे, वैजनाथ कांबळे, गणेश कांबळे, एकनाथ शिंदे, नरेश यमगर, नितिश नागरगोजे,  श्रीकांत गिराम, माधव महाराज ननवरे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment