तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

साईप्रेम फाऊंडेशनच्या वतीने देवीच्या भक्तांना नवरात्रोत्सवात मोफत प्रवासाची सुविधा व खिचडी

वाटप-सौ.जयश्री गित्ते-मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळीतील साईप्रेम फाऊंडेशनच्या वतीने यावर्षी नवरात्रोत्सवात कालरात्रीदेवी मंदिर ते डोंगरतुकाई देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना मोफत प्रवासाची सुविधा तसेच डोंगरतुकाई मंदिर परिसरात 9 दिवस दररोज खिचडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती साईप्रेम फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा संयोजिका सौ.जयश्री गित्ते-मुंडे यांनी दिली.
    अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व अध्यात्मिक कार्यात काम करणार्‍या साईप्रेम फाऊंडेशनने यावर्षी नवरात्रोत्सवात कालरात्री देवी मंदिर पासुन डोंगरतुकाई देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत मोफत ट्रॅव्हल्सद्वारे प्रवासांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शटल सर्व्हीस प्रमाणे ही सुविधा चालु राहणार असुन कालरात्री देवी मंदिर पासुन डोंगरतुकाई देवी मंदिर पर्यंत व तसाचा परतीचा प्रवास या गाड्यांचा राहणार आहे. याशिवाय डोंगरतुकाई मंदिर परिसरात 9 दिवसभरात भाविकांना खिचडीचे वाटप यावर्षी केले जाणार आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साईप्रेम फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा संयोजिका सौ.जयश्री गित्ते-मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment