तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस सात वर्षाची शिक्षा अखेर बाबासाहेब गायकवाड यांना मिळाला न्याय


परळी (प्रतिनिधी): अंबेजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु असलेल्या विशेष अत्याचार प्रतिबंधक केस नं.०८/२०११ शासन... विरुद्ध जावेद व इतर सात या प्रकरणामध्ये निकाल लागला असून आरोपींना कलम ३०७, १४८, १४९ कलमान्वये दोषी धरण्यात आलेले असून त्यानुसार आरोपींना सात वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. असा निकाल माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्र.१ न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी दि. ११ ऑकटोबर रोजी दिला आहे. 
      या प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, सदर प्रकरणातील फिर्यादी परळी येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब उर्फ बापू गायकवाड हे अनुसूचित जातीतील मागासवर्गीय घटकातील आहे व सर्व आरोपी हे मुस्लिम समाजाचे आहेत. आरोपी जावेद व फिर्यादी बाबासाहेब यांची आपसांत मैत्री होती व त्यामध्ये ते छोटे-मोठे बांधकामाचे गुद्दे घेत होते. त्यामध्ये जावेदचे फिर्यादीकडे बांधकामातील मजुरीचे १०,०००/- रुपये येणे लागत होते. त्यामुळे आरोपी ने दि.१८/०६/२०१० रोजी एन. के. यांच्या शोरूम मध्ये पैशाची मागणी केली. व त्यामध्ये त्यांची बाचाबाची झाली. व आरोपी तेथून निघून जाऊन गैरकायदेशीर रित्या मंडळी जमवून १. जावेद खान पठाण, २. सैय्यद सादेख समद, ३. शेख जुबेर शेख शबीर, ४.शेख निझाम शेख बाबू , ५. समद अमजद सिद्दीकी ६. सैय्यद तौफिक सैय्यद फुरखान ७. मुशीरइस्माईलखान पठाण ८. अय्याज शेराज खान आणि ९. बबलू उर्फ समीर लतिफखान पठाण यांनी तलवार व काठ्यांनी बाबासाहेब गायकवाड यांस डोक्यात व हातावर वार केले. त्यानंतर फिर्यादीस लातूर येथील लहाने हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया त्यांचा जीव वाचवण्यात आला. व पोलीस स्टेशन परळी येथे गुन्हा रजिस्टर नं. ७८/२०१० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीपक्षाची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने सदर प्रकरणातील सर्व आरोपीस कलम ३०७, १४८, १४९ भा.द.वि. अन्वये सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ५,०००/- दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी आणि कलम १४८ भा.द.वि. अन्वये दोन वर्षे शिक्षा व ५००/- रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकत्रितरित्या भोगवायच्या आहेत. अनु. जाती व जमाती कायद्यामधून आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. ए.व्ही. कुलकर्णी, तर आरोपीच्या शिक्षेबद्दल ऍड. डी. व्ही. चौधरी, ऍड. डी. आर. गोरे, पोलीस जमादार गोविंद कदम व  आर. आर. देशमुख यांनी सहकार्य कले. दरम्यान या न्यायनिवाडा निकालाचा परळी येथे लक्ष्मीबाई टॉवर, इंदिरा नगर व भीमवाडी कॉर्नर येथे बाबासाहेब गायकवाड यांना न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच दंडमशाहीला परळी शहरात मोठी चपराक बसली असून निकाल लागल्यापासून परळीत जोरदार चर्चा होती. परळी मध्ये कायद्याचाच राज्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.

No comments:

Post a Comment