तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

संभाजी महाराजांवर वादग्रस्त लिखान करणाऱ्या लेखिकेवर जिंतूरात गुन्हा दाखल


जिंतूर :
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा वतीने एकात्मिक पूरक वाचन योजने अंतर्गत शाळेला पुरविण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल वादग्रस्त लिखान केल्या प्रकरणी लेखिका प्रकाशक व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण विभागातील अधिकारी यांच्यावर संभाजी ब्रिगेड या सामाजीक संघटनेचा तक्रारी वरून दि 12 ऑक्टोबर रोजी रात्री जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य सैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा सोबतच इतर महापिरुषांच्या इतिहासाची माहिती मिळावी या उद्देशाने एकात्मिक पूरक वाचन योजने अंतर्गत रामदास महाराज यांच्या जीवन चरित्रावरील समर्थ श्री रामदास स्वामी या नावाचे पुस्तक 5 ऑगस्ट रोजी पहिली आवृत्ती प्रकाशीत करण्यात आलेली ही आवृत्ती राज्यातील सर्व शाळेना पुरवण्यात आली होती मात्र लेखिका शुभा साठे यांनी या पुस्तकातील पा न  18 वर महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर कोणतेही एतेहासिक पुरावे न देता बदनामी कारक लिखाण केले आहे म्हणून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा वतीने आक्षेप घेऊन राज्यातील शाळेना वितरीत करण्यात आलेले पुस्तकावर तत्काळ बंदी घालून हे पुस्तक मागे घेण्याची मागणी लावून धरली होती दरम्यान शहरातील शंभू प्रेमींच्या मनात भावना तीव्र झाल्या होत्या यातूनच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजीक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून लेखिका शुभा शशांक साठे,पुस्तकाचे लाखे प्रकाशक व विद्या प्राधिकरनाचे अधिकारी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कलम 295,34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत

विकृत लेखिकेला तात्काळ अटक  करा अन्यथा दारूची अंघोळ घालू -  छगन शेरे

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणा-या विकृत लेखिका शुभा साठे हिच्यावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावी.तसेच सदर पुस्तकाचा प्रसार करणा-या शिक्षण विभागावर देखील त्वरीत कारवाई करावी.अन्यथा प्रशासनातील अधिका-यांना दारूची अंघोळ घालू असा गर्भित इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिला आहे.

No comments:

Post a comment