तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 October 2018

ना. धनंजय मुंडेंच्या पुढाकारातून आदरणीय स्व. पंडीतअण्णा मुंडेंच्या स्मरणार्थ सात दिवस मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन - डॉ. संतोष मुंडे

शिबिराच्या पहिल्या टप्प्यात सात गावांत होणार मोफत रक्त तपासणी

परळी वैजनाथ दि१३--------------------जनसामान्यांसाठी आयुष्य वाहिलेले, शेतकऱ्यांचे कैवारी, विमा महर्षी आदरणीय स्व. पंडीतअण्णा मुंडे यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त विरोधी पक्षनेते ना. धंनजय मुंडेंनी पुढाकार घेऊन सात दिवस मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती शिबीर संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या शिबिरामध्ये आजकाल महागड्या झालेल्या रक्ताच्या तपासण्या जश्या की सी.बी.सी., थायरॉईड, सिकल सेल, थॅलेसिमिया व ऍनिमिया अंदाजे पंधराशे रुपयांचा खर्च लागणाऱ्या तपासण्या संपूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. विशेषतः आजकाल भारतात महिलांमध्ये थायरॉईड व ऍनिमियाचा प्रादुर्भाव पहायला मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना याचा लाभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात सात दिवस सात गावांत या तपासण्या होणार आहेत. शिबिराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:-

दि. १५ ऑक्टोबर रोजी नाथरा,  दि. १६ ऑक्टोबर रोजी दादाहरी वडगांव, दि. १७ ऑक्टोबर रोजी पौळ पिंपरी, दि. १८ ऑक्टोबर रोजी नंदागौळ, दि. १९ ऑक्टोबर रोजी तेलघाणा, दि.२० ऑक्टोबर रोजी तळेगांव, दि. २१ ऑक्टोबर रोजी जगमित्र कार्यालय परळी वैजनाथ येथे मोफत रक्त तपासणीच्या पहिला टप्याचा समारोप होईल. सात दिवसांत रोज सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान होणाऱ्या मोफत शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेण्याचे आवाहन शिबीर संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment