तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Sunday, 14 October 2018

समता परिषद 'निर्भय दिन' साजरा करणार - चक्रधर उगले

प्रतिनिधी
पाथरी:-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस राज्य व देशभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते 'निर्भय दिन' म्हणुन साजरा करत असतात. उद्या परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्ह्यात 'निर्भय दिन' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी दिली.

उद्या दिनांक १५ ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस असुन, जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे 'निर्भय दिन' साजरा करणार असल्याचे चक्रधर उगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment