तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

डॉ.संतोष मुंडे व ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या हस्ते प्रशांत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुकास्पद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लिंबोटा येथील युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशांत कराड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पेढा भरून सत्कार करण्यात आला. तसेच केक कापुन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे व भागवताचार्य ह.भ.प.तुकाराम महाराज, ह.भ.प.गोविंद महाराज केंद्रे यांच्या हस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या सर्व कार्यक्रमांचे डॉ. मुंडे व महाराजांनी कौतुक केले.
         युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कराड यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे युवा नेते प्रशांत कराड यांनी आभार मानले.   
    येथील श्रीनाथ हाँस्पटल येथे मित्र परिवाराच्या वतीने र्हदय सत्कार करण्यात आला.  यावेळी रामेश्वर कराड, गजु पले, अशिष मुंडे, महेश शिंदे, पिनु मुंडे, पत्रकार अभिमन्यू फड, महादेव गित्ते,  विनायक कराड, संदिपान मुंडे व आदी यांच्या सह इतर मित्र उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment