तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

स्व मोहनलालजी बियाणी व्याख्यानमाले अंतगर्त कविता रंगते कोजागिरीत कविसंमेलन

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जेष्ठ संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ चालवण्यात येत असलेल्या स्मृती व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प येत्या 23 ऑक्टोबर रेाजी गुंफण्यात येणार आहे. यानिमित्त नामांकित कवींचे कविता रंगते कोजागिरीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बहारदार कवींतांचा हा कार्यक्रम लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे सायंकाळी 6 वाजता होणार असल्याची माहीती संयोजकांनी दिली आहे.

गेल्या तीन  महिन्यांपासून स्व.मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे. येत्या 23 ऑक्टोबर रोजी या व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प गुंफण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या कविता रंगते कोजागिरीत या कार्यक्रमास राज्यातील नामांकीत कवी येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दै.पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी तर प्रमुख अतिथी म्हणून मसाप बीड शाखेचे अध्यक्ष डॉ.सतिश साळुंके उपस्थित राहणार आहेत.

नामांकीत कविंमध्ये नाशिक येथील संजय चौधरी, अमरावतीहून नितीन देशमुख, पुण्याच्या संगीता झिंगुरके,  मंगळवेढ्याचे इंद्रजीत घुले आदींचा सहभाग असणार आहे. या कवींनी आपल्या बहारदार रचनांनी महाराष्ट्रातील जनमनावर मोठे अधिराज्य निर्माण केलेले आहे. त्यांचा कार्यक्रम परळीत होणार असल्याने ही एक मोठी पर्वणीच कवीतेच्या रसिकांसाठी असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा साहीत्य परिषद, परळी पत्रकार संघ, राधा-मोहन साथी प्रतिष्ठान दै. मराठवाडा साथी परिवाराच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड, उपाध्यक्ष अरूण पवार, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, कोषाध्यक्ष संजय आघाव, परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने, शहराध्यक्ष दत्तात्रय काळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचेे निमंत्रक मोहन व्हावळे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment