तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

समाजवादी नेते शशिकांत कर्पे यांचे मुंबईत निधन

वेंगुर्ले प्रतिनिधी-सुरेश कौलगेकर                  सिंधुदुर्ग वेंगुर्ले येथील ‘कल्पना ट्रेडर्स‘चे मालक शशिकांत शंकर कर्पे यांचे काल दि.११ ऑक्टोबर रोजी रात्रौ १ वाजता वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. शुक्रवारी (दि.१२) सकाळी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

      शशिकांत कर्पे हे बॅ.नाथ पै, बॅ.मधू दंडवते यांचे खंदे समर्थक व ज्येष्ठ समाजवादी नेते म्हणून जिल्ह्यात परिचित होते. समाजवादी विचारांचा तत्वनिष्ठ व बुद्धीवादी नेता म्हणून नेहमीच ते जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसरपणे कार्यरत होते. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असणा-या सिधुदुर्ग व रत्नागिरी मतदार संघात त्यांनी बॅ. नाथ पै, बॅ.मधू दंडवते यांच्यासोबत राजकीय आघाडीवर काम केले. सिधुदुर्ग जनतादलाचे ते काही वर्षे जिल्हाध्यक्ष होते.

      जिल्ह्यातील वास्तव्यात दंडवते यांचा मुक्काम त्यांच्या निवासस्थनी असायाचा. वेंगुर्ले तालुक्यातील इंडियन एज्युकेशन सोसायटी,वेंगुर्ले नगरवाचनालय, व्यापारी संघ आदी विविध संस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले.

      त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलमेंट सेंटरचे संचालक संजिव कर्पे यांचे ते वडील होत.

फोटो - शशिकांत कर्पे

No comments:

Post a Comment