तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 October 2018

धार्मिक सणाचे बाजारीकरण करू नका सणाला महत्व द्या


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : आपला भारत विविधतेने नटलेला देश आहे .आपल्या या देशात विविध जातीचे , धर्माचे लोक राहतात .मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात अनेक जातीचे धर्माचे पंथाचे विविध भाष्या बोलणारे लोक राहतात .पण सगळे जण एकमेकांच्या सणात सामील होतात उदा.गणपती उत्सव , दहीहंडी , नवरात्री, असो
गेल्या काही वर्षामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे स्वरूप पालटले आहे. हे सण साजरे करताना मोठया प्रमाणावर अर्थकारण होत असते. राजकीय पक्षांसाठी तर ही सुवर्णसंधी असते. गेल्या दोन-तीन वर्षापासून तर पक्षांनी या सणांचा ‘इव्हेंट’ केला आहे. त्याच्या बाजारीकरण केले आहे  ‘काही मंडळे नवरात्री सण म्हणून न पाहता अर्थार्जनाच्या मागे असतात. यामुळे आर्थिकदृष्टया तगडया प्रायोजकांच्या जाहिराती या मंडळांच्या मंडपांत आढळतात. काही मंडळांची देवी नवसाला पावतात, असा समज असल्याने भाविकांच्या मोठया रांगा लागतात. काही देवीच्या दर्शनासाठी ‘सेलिब्रेटीं’ची गर्दी असते, त्यांना पाहण्यासाठीच भाविक गर्दी करतात, बाजारीकरण थांबवा, भगवंत भक्तीचा भुकेला! पैसा फेको तमाशा देखो, सणांचे सेलिब्रेशन नको!
आपल्या प्रत्येक सणाचे रूप पालटते आहे; कारण त्यात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे आणि याचेच उदाहरण आपल्याला दहीहंडीत दिसले.  गणेश उत्सवातदेखील दिसेले . प्रत्येक गणेश मंडपाबाहेर मोठ-मोठया पक्षांच्या, राजकीय नेत्यांचे गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देण्याचे फलक, बॅनर झळकले आणि आता ते नवरात्रीतही पाहावयास मिळत आहे . या सर्वामुळे आपल्या सणाचे रूप खरेच पालटले आहे. आपले सण हे या मार्गातून पैसा कमावण्याचे माध्यम होऊ लागले आहेत. या सर्वात आपल्या सणाचे पावित्र्य कमी होऊ लागले आहे व त्याचे बाजारीकरण वाढत आहे.
गुजरात्यांचा लोकप्रिय ठरलेला गरबा व दांड्या रास हा कधी ना कधी व्यावसायिक रूप धारण करणार  फाल्गुनी पाठक , प्रिती आणि पिंकी यांचा खासगी दाड्यां रास तरूण-तरूणींच्या गर्दीने जेव्हा जोमाने आणि दमदार अंदाजाने खेळला जातो. तेव्हाच आयोजकांना समजून चुकले की नऊ दिवसांत संपूर्ण वर्षाची कमाई करणारा हा नवरात्रौत्सव आहे.त्यामुळे गायनकलेतील विवीधता सादर करणाऱ्यां कच्छी बॅण्ड ,वेस्टर्न बॅण्डही, ऑर्केस्ट्रा दांड्या व गरबा राससाठी गर्दी खेचणारे म्हणून ओळखले जाऊ लागले.त्याचेही मार्केटिंग नीट झाले.सहाजिकच होमलोन देणाऱ्या बँका,डेकोरेटर्सबरोबरच शीतपेयाच्या कंपन्या,
खाद्यपदार्थांचे स्टॉलही दांडिया व रास गरबा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी लावून कमाई करू लागले. गेल्या पाच वर्षांपासूंन परदेशस्थ नागरिक गरबा व दांडियामध्ये सहभागी होतात.काही स्टार्सनाही आणले जाते हे पाहून तरूणाई स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी पारंपारिक पण नवनवीन फॅशन टच असणारे ड्रेसेस घालून नाचू लागल्याने श्रीमंताच्या दांडिया व गरबा रास सर्वसामान्यही सहभागी होण्यासाठी धडपड करू लागले.मग परिणामी दिवसांकाठी प्रत्येकी २०० रूपये ते २००० मोजून प्रवेशपांस मिॆळवून खेळला जातो हे समजल्यावरून ईव्हेंट कंपन्या सुरूवातीला कमी पैशांत आयोजित करत होते.आता मात्र खुल्या मैदानांना पत्रे,पडदे लावून मोठमोठाले शामियाने उभारून दांडिया व गरबा सुरू झाला आहे.त्याची तिकीट २०० ते २००० रूपयांपर्यंत गेली आहेत.ह्या इव्हेंट कंपन्यांना मिळणारा तरूणाईचा प्रतिसाद पाहून त्यांचे उखळ पांढरे झाले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
नवरात्री उत्सव मंडळ या वर्षी आई जगदंबेची स्थापना करीत असेल तर आपल्याला कळकळीची विनंती आहे.या देवीला येणाऱ्या साड्या चोळ्या निर्माल्यात टाकणे अथवा लिलावात काढण्यापेक्षा आप आपल्या विभागातील गरीब वस्तीत,रस्त्यांच्या कडेला रहात असलेल्या अथवा आदिवासी पाड्यात असलेल्या गरजू महिलांना सन्मानपूर्वक नेऊन द्या,

No comments:

Post a Comment