तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 October 2018

शहरातील रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रविवारी ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते पहिला हप्ता वाटप

परळी प्रतिनिधी दि.११........परळी नगर परिषद अंतर्गत शहरातील ज्या नागरीकांना रमाई घरकुल योजनेचे घरकुल मंजूर झाले आहे. अशा लाभार्थ्यांना या योजनेतील पहिला हप्ता वाटप करण्यात येणार असून रविवार दि.14 ऑक्टोबर 2018 रोजी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात येणार आहे.

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे रविवार, दि.14 आरॅक्टोबर रोजी सायं.6 वा. होत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे तर प्रमुख पाहुणे म्हणून न.प.गटनेते वाल्मीक अण्णा कराड , राष्ट्रवानी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यख अय्युबभाई पठाण, स्वच्छता सभापती विजय भोयटे, पाणी पुरवठा सभापती सौ.प्राजक्ता भावड्या कराड, बांधकाम सभापती शेख रियानबी शरीफ, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, महिला व बालकल्याण सभापती सौ.मिना पांडूरंग गायकवाड, माजी नगराध्यक्ष जाबेर खाँ पठाण, दिपक देशमुख, माजी सभापती तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी, शकील कुरेशी, शरद मुंडे, सोमनाथअप्पा हालगे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, भास्कर मामा चाटे, विशेष अतिथी म्हणून जि.प.सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ,  कृ.उ.बा.स. सभापती अ‍ॅड.,गोविंपदराव फड, जि.प.सदस्य प्रा.मधुकर अघाव,  प.सं.सभापतीपती मोहनराव सोळंके, उपसभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, जेष्ठ नेते माऊली गडदे, कृ.उ.बा.स.माजी सभापती सुर्यभान नाना मुंडे आदींची उपस्थिती राहणार आहे. परळी शहरात विधान परिषद विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.च्या पदाधिकार्‍यांनी शहरातील अनेक भागात दौरे करुन रमाई घरकुल योजनेत पात्र असणार्‍या लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुण याचा पाठपुरावा केला. या योजनेत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे धनादेश वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व परिसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी न.प.च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment