तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 October 2018

लाखों रुपयांना फसवुन धुम ठोकणार्‍याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पंधरा दिवस उलटुन गेले तरी आरोपीचा पत्ता नाही
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.28   
    शहरातील प्रेमप्रज्ञानगर भागातील किशन मुरलीधर बाहेती यांच्या विरुध्दात 13 ऑक्टोंबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यास पंधरा दिवस उलटले तरी अद्याप बाहेतीचा शोध लागला नाही. किशन बाहेती हा आपल्या कुटुंबासह अनेकांना फसवुन परळीतुन फरार झाला आहे.
    प्लॉट खरेदी करुन देतो असे सांगुन वेळावेळी नगदी रक्कम घेऊन इसार पावत्या व रशीद पावत्या दिल्या. परंतु बोली प्रमाणे प्लॉट खरेदी करुन दिला नाही. व फसवणुक करुन विश्‍वास घात केला अशी तक्रार शहरातील विवेकानंद नगर भागातील सत्यनारायण धोंडीरामजी लोहिया यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात 13 ऑक्टोंबर रोजी फिर्याद दाखल केली. त्यावरुन किशन मुरलीधर बाहेतीच्या विरोधात 33 लाख रुपयाला फसविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास परळीचे शहर पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाल पोलिस जमादार बापु लांडगे हे करीत आहेत. 
    किशन बाहेती यांनी लोहिया यांना 33 लाख रुपयाचा फसविले आहे. तसेच शहरातील आणखी इतर कांही जणांनाही आमिष दाखवुन फसविले आहे. फसविणार्‍याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हात उसने घेऊनही अनेककांना बाहेती यांनी गंडा घातला आहे. किशन बाहेती व त्यांचे बंधु गेल्या दोन महिन्यापासुन परळीत नसल्याची माहिती आहे.
    पद्मावती गल्लीतील चंद्रसेन थावरे पाटील यांनहीही किशन बाहेतीच्या विरोधात आरोप केले आहेत. आपल्याला ही फसविले असल्याचे चंद्रसेन थावरे पाटील यांनी म्हटले आहे. खोटा धनादेश देऊन गंडा घातला आहे. त्याच्या विरोधात लवकरच पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे थावरे पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment