तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 October 2018

परळीत सार्वजनिक दुर्गोत्सवाचे ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन ; दुर्गोत्सवात

विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार-फुलचंद कराड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठान , परळी वैजनाथ आयोजित सार्वजनिक दुर्गोत्सव-2018 अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  दि.10 ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. दि.18 ऑक्टोंबर पर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये किर्तन, आर्केस्ट्रा होणार आहे.
    शहरातील मोंढा मैदान येथे दररोज सायंकाळी 7 वाजता 9 दिवस सार्वजनिक दुर्गोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दि.11 रोजी होणार आहे. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. बुधवार दि.10 रोजी घटस्थापना होणार आहे. दि.11 रोजी लावण्यातारका, दि.12 जागरकुलस्वामिनींचा, दि.13 कवाली मुकबला, दि.14 रोजी ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांचे किर्तन, दि.15 रोजी सप्तसुर स्वरमंच ऑर्केस्ट्रा, दि.16 भिमसागर ऑर्केस्ट्रा, दि.17 महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी पुजा पाटील व पुनम कुडाळकर यांची लावणी, दि.18 रोजी तोतला मैदान येथे रावण दहण होणार आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment