तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 October 2018

संविधान जागृती अभियान अंतर्गत स्वाभिमान मतदार निर्माण होण्यासाठी वैजापूर तालुक्यात बहुजन वंचित आघाडी प्रयत्न करणार -  लक्ष्मण धनेश्वर

 

प्रतिनिधी - सुधीर बागुल - वैजापूर

राज्यभरातल्या पुरोगामी विचारांच्या पक्षांना एकत्रित करुन वंचित बहुजन आघाडी स्थापना  प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच  केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून येत्या विधानसभा राज्यसभा  निवडणुकांमध्ये लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आंबेडकर जनतेला आघाडीची भूमिका सांगण्यासाठी राज्यभर दौर्‍याची सुरवात औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात घोषणा केली आहेत.
याचाच एक भाग म्हणून संविधान जागृती अभियान अंतर्गत स्वाभिमान मतदार निर्माण होण्यासाठी वैजापूर तालुक्यात बहुजन वंचित आघाडी प्रयत्न करणार असे प्रतिपादन भारीपाचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनेश्वर यांनी नालेगाव येथील आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या शाखा स्थापन प्रसंगी बोलत होते ते बोलतांना पुढे म्हणाले की वैजापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय संविधान जागृती अभियान अंतर्गत स्वाभिमान मतदार निर्माण होण्यासाठी व मतदार कोणत्याच अमिशाला बळी न पडता स्वाभिमानाने मतदानाचा हक्क बजवावा या करिता हे अभियान राबविण्यात येत आहेत. 

 या अभियानाचा समारोप 6 डिसेंबर 2018 रोजी वैजापुर येथे वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अमित भुईंगळ , चंद्रकांत जानराव,  लक्ष्मण धनेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. 

वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटक जानराव बाबा,अध्यक्ष वेनुनाथ बागुल, लक्ष्मण धनेश्वर, प्रल्हाद सातुरे, यशवंत पडवळ,संजय बागुल, मनोज पठारे,अमोल दिवे,शंकरराव पठारे,पंढरीनाथ सातूरे, लालखा पठाण ,बाळु पवार, विनायक सातुरे, बापु धनेश्वर, मच्छिंद्र पठारे,बाबुभाई पठाण, संतोष गायकवाड, पोपट पठारे,संदीप कुमावत, भिमराव गायकवाड, भगवान जानराव, दिपक गाडगे, सिद्धार्थ त्रिभुवन, म्हसु कुमावत, पांडुरंग जानराव, विशाल गायकवाड आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील पहीली शाखा वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे स्थापन. 

No comments:

Post a Comment