तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 30 November 2018

अवयवदानासाठी जनजागृतीची गरज-देशपांडे

प्रतिनिधी
पाथरी:-अवयव आणि  देहदान महासंघ मुंबई आयोजित औरंगाबाद ते तुळजापूर जनजागृती पदयात्रे चे स्वागत व या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब मानवत -पाथरी च्या वतिने शहरातील हॉटेल सीटी प्राईड या ठिकाणी करण्यात आले. या विषयीचे सखोल मार्गदर्शन मुंबईकर देशपांडे बंधूनी केले.                              आपल्या मृत्यूनंतरही आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुस-या व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही.परंतु अवयव दान व देहदान याविषयीची जनजागृती होणे गरजेच असल्याची मत व्यक्त केले.                                                                                 
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डॉ.जगदीश शिंदे, डॉ.मानवतकर, डॉ.अतुल भाले आदींसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की, स्वयंसेवी संस्था, मंडळे वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करताना दिसतात. नेत्रदानाचेही महत्त्व आता लोकांना पटू लागलेय. त्यामुळे नेत्रदान करण्याकडेही त्यांचा कल वाढू लागलाय. परंतु अवयवदात्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अजूनही अनेकांच्या मनात अवयवदानाविषयी गैरसमज आहेत. अभ्यासक्रमामध्ये नेत्रदानाविषयी, रक्तदानाविषयी माहिती असते. मात्र आता अवयवदानाविषयी माहिती देणे गरजेचे आहे. किडनी, यकृत,फुपूसे,हृदय, त्वचा इत्यादी अवयव मृत्यूनंतर गरजू व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. पुराणकाळातील दधिची ऋषींनी तर आपली हाडे दान दिली होती. त्या अस्थीपासून तयार केलेल्या वज्राने वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यात आला होता, अशी कथा आहे. पण तरीही अवयवदान म्हटले की भारतीय मध्ये कमालीची अंधश्रद्धा आहे .                   
  पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो.                        अवयवदान म्हणजे एखादी आजारी व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या टप्यात असताना वयक्तिक किंव्हा नातेवाईकांच्या इच्छे नुसार त्याच्या शरीरातील अमूल्य अश्या 9 अवयवांचे प्रत्यारोपण इतर गरजू रुग्णांच्या शरीरात करण्याची परवानगी देणे व या 9 व्यक्तींना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचण्याचा अमूल्य असं सत्कार्य.         त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे, किडनी, लिव्हर, हृदय,फुपूसे अश्या महत्वपूर्ण अवयवांमुळे बऱ्याच रुग्णांना  जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात.

सुरू होण्यापुर्वीच केजच्या सुतगिरणीमध्ये भ्रष्टाचार विधापरिषदेत झाली चर्चा; बैठक होऊ होणार चौकशी


मुंबई दि.30 (-) लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने केज येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीला आजवर 27 कोटी 41 लाख रुपयांचे शासकीय भाग भांडवल मंजुर करण्यात आले. मात्र संस्था सुरू होण्यापुर्वीच झालेल्या गैरकारभारामुळे या संस्थेची चौकशी सुरू झाली. याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करताच प्रशासनात खळबळ माजली आहे, याबाबत बैठक बोलाविण्याचे निर्देश सभापतींनी दिले असल्यामुळे लवकरच दोषी विरूध्द कारवाईचे संकेत मिळत आहेत.
केजच्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीला शासनाने सन 2015-16 मध्ये 7 कोटी रुपये तर, सन 2016-17 मध्ये 20 कोटी 41 लाख रुपये शासकीय भाग भांडवल मंजुर केले आहे. शासनाकडून भाग भांडवल मंजुर करताना सुतगिरणीने शासन नियम व निकषांची पुर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुतगिरणीच्या 29 टक्के सभासदांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, संस्थेच्या पोटनियमातील तरतूदीनुसार 2 तज्ञ संचालकांची नियुक्ती झालेली नाही. सुतगिरणीला कापुस पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र सुध्दा अद्याप उपलब्ध झालेले नाही, सभासदांची के.वाय.सी. अपुर्ण आहे. यासह अनेक गंभीर आक्षेप लेखा परीक्षकांनी अहवालात नमुद केले आहेत. याबाबत शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून विशेष लेखा परीक्षक वर्ग-1 (सहकारी सुतगिरणी) सोलापूर यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने केज येथे स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्यापुर्वी भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याची बाब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना स्पष्ट झाले आहे. नियम 93 अन्वये या बाबत विधान परिषदेमध्ये हा विषय मुंडे यांनी मांडला. संबंधित विभागाचे मंत्री गैरहजर असल्याने सभापतींनी या बाबत त्यांच्या दालनात बैठक बोलाविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या गैरव्यवहारातील दोषींचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य सर्वांसाठी प्ररेणादायी- बाळासाहेब देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांची चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍग्रीकल्चरच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याने परळी येथे नुकताच त्यांचा परळी येथील विधीज्ञ अँड. मनजित सुगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना  बाळासाहेब देशमुख म्हणाले की, डॉ. संतोष मुंडे हे गेल्या अनेक वर्षापासून परळीसह राज्यभरात दिव्यांगांसाठी काम करीत असतात. त्यांनी केलेल्या कामातून अनेक दिव्यांगांना लाभ मिळाले आहेत. मागील 2 वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम सुरु आहे. त्यांचे कार्य हे युवकांसाठी प्रेरणा देणारे असल्याचे देशमुख यांनी सागीतले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश आण्णा टाक यांच्यासह एसटी संघटनेचे रमेश गित्ते,ऍड. मनजीत सुगरे, सेवादलाचे अध्यक्ष लालासाब पठान, चंदु हालगे, रणजीत सुगरे, लल्ला गित्ते, आकाश शिगे, विजय राठोड, राजा माने, दर्शन सपाटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रवि अघाव, प्रशांत मस्के, योगेश स्वामी , अमोल राठोड, लक्ष्मण काळे,सोहिल भाई, गणेश सलगर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजक अँड.मनजीत सुगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन लाला पठाण यांनी मानले.

मुद्राबँक कर्जा साठी लिडबँक व्यवस्थापकाला घालणार घेराओ

जिल्हाधिका-यांना दिले निवेदन

प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील सुशिक्षित बेरेजगार तरूणांना मुद्राबँक योजने अंतर्गत  कर्ज पुरवठा करत नसल्याने तालुक्यातील तरूण सात डिसेंबर रोजी परभणीत लीड बँक व्यवस्थापकाला घेराओ घालनार असल्याचे निवेदन परभणी जिल्हाअधिकारी यांना दिले आहे.
केंद्र शासनाने 2018-19 चा अर्थ संकल्प सादर करतांना प्रधानमंत्री मुद्राबँक योजने अंतर्गत चालू वर्षा साठी तीन लक्ष कोटीचे कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. या योजने अंतर्गत वाढीव उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. कष्टकरी, सामान्य जनतेच्या प्रत्यक्ष अप्रत्येक्ष कर रुपातून निर्माण होणा-या गंगाजळीच्या आधाराने केंद्र शासन थकीत कर्जाच्या चिंतेने त्रस्त असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. थकीत कर्ज चिंतेला मोठ्या धेंडांच्या कार्यपद्धती कारणीभूत आहेत. मात्र त्याचा सरळ फटका वंचित तथा सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजनां मध्ये स्पष्ट दिसत असल्याचे या उपोषण कर्त्यांचे मत असून सुशिक्षित तरूणांच्या कर्ज प्रस्तावावर नियमा नुसार कार्यवाही करून कर्ज प्रकरणे तात्काळ मार्गीलावावे या साठी या पुर्वी पाथरीतील इंडिया बँके समोर 12 नोहेंबर रोजी उपोषण केले होते. या वेळी बँकेने लेखी आश्वासन दिले होते मात्र पाळले नाही त्या मुळे आता परभणी येथिल लीड बँक व्यवस्थापकाला 7 डिसेंबर रोजी या विषयी घेराओ घालून जाब विचारणार असल्याचे निवेदन गुरूवारी 29 नोहेंबर परभणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले आहे. शेख अजमेद्दीन,  शे दगडू शे नायब, शेख अनिस शेख बडे साब, परमेश्वर चाफाकानडे, आप्पाराव टिपरे, अंगद घुंबरे, वसीम पठाण, शेख अबू तालेब, शेख सुलतान, चैतन्य घुंबरे, शेख फकीर यांच्या स्वाक्ष-या आहेत.

य एस ओ जि प शाळा बोराखेडी येथे शाळा व्यवस्थापण समितीची अनापोज

मोताळा :-(प्रतिनिधी ) आय एस ओ जि प शाळा बोराखेडी येथे शाळा व्यवस्थापण समितीची अनापोज निवड. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली आय एस ओ जि प शाळा बोराखेडी येथे शासन निर्णय17जुन 2010 नुसार विद्यार्थी व शाळा विकास करण्यासाठी दर दोन वर्षांत नविन शाळा व्यवस्थापण समिती स्थापन करण्यात आली.मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शाळा व्यवस्थापण समिती यांचे कर्तव्य व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.सरपंच सुरेश गर्दे मागील समिती ,पालक ,गावकरी यांच्या सहकार्यानेच शाळेचा विकास  होऊन शाळेला आय एस ओ मानांकन मिळाले आहे हे आवर्जून सांगितले पुढेही नवीन समिती असेच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.विशेष म्हणजे शाळा समिती शांततापुर्वक व खेळीमेळीच्या वातावरणात आदर्शपणे समिती स्थापण करण्यात आली. खरोखरच येथील पालकांचा आदर्श घेण्याची गरज आहे आहे, कोणताही वाद निर्माण न करता समिती स्थापन केली. नविन शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष किशोर सिताराम चहाकर, उपाध्यक्ष सौ.नम्रता नितीन राणे ,सदस्य रमेश श्रीराम धोरण, सौ संगीता फुंड, सौ पार्वता गुंजकर,सौ मीनाताई पुरभे, भागवत जगदेव पवार, सुरेश तात्या असोलकर,बशीर खाँ रशिद खाँ सर्व वंचित घटकांना प्रतिनिधित्व देऊन आदर्श समिती स्थापन करण्यात आली. यावेळी मोलाचे सहकार्यासाठी सरपंच सुरेश गर्दे, उपसरपंच सुनिल तेलंग, अध्यक्ष संगिता ढाके उपाध्यक्ष अशोक तेलंग संतोष चहाकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षणाचा निर्णय भाजप सरकारमुळेच मार्गी लागला

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केले निर्णयाचे स्वागत

बीड दि. २९ ------ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय अखेर भाजप सरकारनेच मार्गी लावला आहे, ओबीसी ला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणाचे मी स्वागत करते अशा शब्दांत खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

    मराठा आरक्षणाच्या विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने त्यांनी दिलेल्या लढ्याचे हे फलित म्हणावे लागेल. हे आरक्षण देताना ओबीसी वर्गाला धक्का लागता कामा नये अशी बहूजन नेत्यांची मागणी होती, त्या अनुषंगाने सरकारने दोन्ही वर्गाचे समाधान केले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब पहिल्यापासूनच आरक्षणाच्या बाजूने होते, त्यानंतर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनीही तीच भूमिका घेतली होती. दरम्यान, सरकारने दिलेले हे आरक्षण म्हणजे मराठा समाजाच्या लढ्याचे हे यश आहे, त्यामुळे  एक डिसेंबर रोजी जल्लोष करा असा मराठा समाजाला दिलेला शब्द सरकारने पाळला असल्याचे खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.

तामगाव पो स्टेचे तत्कालीन ठाणेदार जे के पवार यांना १ हजार रू दंडाची शिक्षा

संग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील न्यायलयात फिर्यादी ज्ञानेश्वर दांदळे यांनी फिर्यादीवरून संग्रामपुर न्यायदंडाधिकारी प्र श्रेणी न्यायलयाचे न्यायधिश निकम यांनी तामगाव पो स्टेचे तत्कालीन ठाणेदार जे के पवार यांना १ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडाची रककम फिर्यादीस दयावे व दंडाची रककम न भरल्यास १० दिवसांची शिक्षा सुनावली दि २१/ ११ /२०१० रोजी कोद्री येथील जातीय दंगल प्रकरणी ज्ञानेश्वर दांदळे याना बेकायदेशीर अटकपुर्व जामीन असतांना अटक केली होती त्यावर दांदळे यांनी विदमान न्यायलयात कलम ३४२ आ पी सी प्रमाणे प्रकरण दाखल केले होते त्यांच्या तफै अड विद्यासागर अलोणे, अॅड प्रमोद घाटे , अड एन सी वाघ यांनी काम पाहिले

मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत सादर केला. त्यानंतर कृती अहवालसोबतच शुद्धीपत्रक काढून मराठा आरक्षणाचं विधेयक सभागृहात मांडलं. 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आश्वासन प्रत्यक्षात उतरवण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. मराठा आरक्षण विषयक विधेयक विधानसभेत मांडले गेले त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एक मताने पाठिंबा दिल्याने, कोणत्याही चर्चेशिवाय मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झाले.विरोधी काँग्रेस पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी विधेयकाचं स्वागत करत असल्याचं जाहीर करुन पाठिंबा दिला.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक विधानपरिषेदत मांडलं आणि तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेकाप, शिवसंग्राम पक्षाने विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला आता हे विधेयक स्वाक्षरीसाठी राज्यपाल विद्याशंकर राव यांच्याकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणाचा कायदा लागू होईल.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे.
मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिन्ही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष कृती अहवालात नोंदवण्यात आला आहे.
ग्रामपंचायती ,पंचायत समित्या ,जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका निवडणुकांसाठी जागांचा आरक्षण अंतर्भाव असणार नाही
मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आभार मानले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रासप, एमआयएम, आरपीआय, अपक्ष या सर्व विरोधीपक्ष नेत्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. सामाजिक प्रश्नांसाठी हे सभागृह एकत्र येऊ शकते, हे आपण दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुळशी पॅटर्नच्या कमाईचे आकडे कोट्यवधींच्या घरात


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : सर्व सिनेमागृहात चित्रपट हॉउसफ़ुल्ल झाला आहे.  चित्रपट प्रदर्शनावरून अनेक वाद सुद्धा झाले आहेत. अनेक जण या चित्रपटाच्या पात्राबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चित्रपटात दाखवलेली स्टोरी खरी आहे कि खोटी हा प्रश्न सर्वांना पडत आहे. खरेतर मुळशी पॅटर्न Mulshi Pattern हा चित्रपट मुळशी भागातील एका डॉन च्या जीवनाशी मिळता जुळता आहे का ? हा नक्की डॉन कोण होता यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल
मराठी सिनेमा आता जुनी कात टाकून नवीन दर्जेदार कथा पटकथा यांचा योग्य मिलाप टाकून दर्जेदार चित्रपट निर्मिती करत आहेत. 'सैराट' सिनेमाच्या माध्यमातून नागराज मंजुळेने  मराठी सिनेमाला  बॉक्स ऑफिसवर 100 करोड रुपयांचा आकडा गाठणे सहज साध्य केले . आता या पाठोपाठ अनेक सिनेमे वेगवेगळे विक्रम करत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'नाळ' हा सिनेमा असाच हटके ठरला. या सिनेमाने एका आठवड्यात 14 कोटी रुपयांची कमाई केली असं असताना आणखी एका सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. तो सिनेमा म्हणजे प्रविण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न'. प्रदर्शित होण्याअगोदरच या सिनेमाची जादू सगळीकडे पसरली. या सिनेमाने 4 दिवसांत 5 करोड रुपयांच कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं आहे. या सिनेमातील दिग्दर्शक प्रविण तरडे यांच आणि अभिनेता ओम भुतकरचं भरपूर कौतुक होत आहे.
हा सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाची जोरदार चर्चा झाली. तसेच अनेकांना टीका देखील केली. वाढत्या शहरीकरणासाठी जमिनी बळकावल्या जातात या वादावर हा सिनेमा भाष्य करतो. जिल्ह्यातील मूळशी तालुक्यात जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री करून शहरांची हद्दवाढत आहे. त्या वाढत्या शहरीकरणातील जमिनीच्या वादावर हा सिनेमा भाष्य करतो. ही केवळ एका तालुक्याची गोष्ट नाही, अख्या देशाची

मराठा आरक्षणाचा निर्णय भाजपा सरकारमुळेच मार्गी लागला आहे : खासदार प्रितम मुंडे


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विषयक विधेयक मांडण्यात आले त्यावेळी ते विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले त्यामुळे १ डिसेंबरला जल्लोश करा हे विधान केले होते ते त्यांनी सत्यात उतरविले .
गेल्या अनेक वर्षापासून प्रलबिंत असणारे मराठी आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे.ओबीसी प्रवर्गाला धक्का न लावता मराठी समाजाला दिलेल्या या आरक्षणाचे मी स्वागत करत आहे.अशी प्रतिक्रया बीडच्या खासदार प्रितमताई मुंडे यांनी दिली.
मराठा आरक्षणाचा हा विषय गेली कित्येक वर्ष मार्गी लागत नव्हता तसेच शांतता पूर्ण मार्गाने केलेले आंदोलन तसेच दिलेल्या लढ्याचे हे फलित म्हणावे लागेल.हे आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गाला धक्का लावू नये अशी मागणी बहुजन नेत्याची होती
त्या अनुषंगाने दोन्ही वर्गाचे समाधान सरकारने केले आहे.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दोघेही मराठी आरक्षणाच्या बाजूने होते त्यामुळे सरकारने दिलेले आरक्षण म्हणजे मराठी समाजाचे हे यश आहे

Thursday, 29 November 2018

संतोषभाऊ मुरकूटे मित्र मंडळाच्या पुर्णा तालुकाध्यक्षपदी गोविंदराव आवरगंड तर संपर्कप्रमुख

पदी गोपाळराव आंबोरे यांची निवड

निवडीचे ताडकळस परिसरात जोरदार स्वागत

ताडकळस / प्रतिनिधी

ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी (ता. पुर्णा) येथील माजी पंचायत समिती सदस्य  तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव आवरगंड यांची नुकतीच संतोषभाऊ मुरकूटे मित्र मंडळाच्या पुर्णा तालुकाध्यक्षपदी तर ताडकळस येथील युवानेते गोपाळराव आंबोरे यांची पुर्णा  तालुका संपर्क प्रमुखपदी व दत्तराव गाडवे यांची ताडकळस शहरप्रमुखपदी निवड झाली असुन त्यांच्या निवडीचे माखणी येथे फटाक्यांची अतिषबाजी करुन जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना आवरगंड म्हणाले की तालुक्यात गाव तिथे शाखेची स्थापणा करुन मित्र मंडळाच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकरी , शेतमजुर व सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्या बरोबरच गोदाकाठाच्या विकासाचे प्रश्न संतोषभाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्याने सोडविणार असल्याचे मनोदय व्यक्त करुन 25 नोव्हेंबर रोजी मित्रमंडळांच्या वतीने आयोजित सर्व धर्मिय संत गौरव सोहळा व संतोषभाऊ मुरकूटे यांच्या अभिष्टचिंतना निमित्त आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील  जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या निवडी बद्दल केरबाजी आवरगंड , रामकिशन काळे , उत्तमराव ढोणे , सदाशीव आप्पा खंदारे , हनुमंत मोहिते , गणपतराव शिंदेे , रमेशराव ठाकुर , मुन्ना राठोड , लक्षमराव वैद्य , नाना कानडखेडकर , अच्युतराव कुऱ्हे , उत्तंमराव कुऱ्हे , कुंडलीक भालेराव , नवनाथा शिंदे , चक्रधर शिराळे , गजानन दुधाटे , रत्नाकर सुर्यवंशी , सोपानकाका बोबडे , रमेश सुर्यवंशी , गोविंद काळे , विशाल भोसले , फिरोज पठाण , छावा संघटनेचे माधव आवरगंड , नामा शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले .

ताडकळस ग्रामपंचायत कार्यालयात ज्योतिबा फुले जयंती साजरी

ताडकळस/प्रतिनिधी

ताडकळस येथील ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त व संविधान सप्ताह निमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुनिताताई राजु पाटील आंबोरे , उपसरपंच खंडेराव वावरे , ग्रामविकास अधिकारी टाले , ग्राम पंचायत सदस्य तुकाराम आळणे , कैलास होनमणे , सुरेश मगरे ,  सौ.शिलाबाई रूद्रवार , सौ. सुजाता मगरे , सौ.तिलोत्तमा लासे , सौ.सरस्वती घोडके ,सौ.प्रयागबाई सलगर , शेख शिकुर , सौ.विजयाबाई आंबोरे , राजु पाटील आंबोरे , बालाजी रूद्रवार , राजेंद्र मगरे ,बि.जी. खरे , भोलानाथ जाधव यांच्या सह आदींची उपस्थिती .