तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 24 November 2018

पाथरी प्रिमियर लीग2 चा खेळाडू लिलाव शानदार कार्यक्रमात संपन्न;तीस लक्ष रूपये खर्चाची मराठवाड्यातील सर्वात मोठी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा;सर्व सामन्यांचे युट्यूब वर लाईव्ह प्रसारण होणार

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-मराठवाड्यातील सर्वात मोठी तीस लक्ष रुपये खर्चाची पाथरी प्रिमिअर लीग2 स्पर्धे साठी चा शानदार खेळाडु लिलाव कार्यक्रम संपन्न झाला. यात चौदा संघ मालकांनी शहरा सह तालुक्यातील आणि  मराठवाड्या सह महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंना लिवात विकत घेतले.

या वेळी आयोजक न प गट नेते जुनेदखान दुर्रानी, तबरेज खान दुर्रानी,निलेश ऱाठोड, यासिन सिद्दीकी, इमरान सय्यद, मुजाहेद खान, आरेफ खान ,आकेफ खान,  इद्यादी मंचावर उपसथिती होते.

या लिलावात जैतापुर रॉयल्स चे मालक साजीद राज,ताजुद्दीन फारोकी, एकतानगर चँम्पीयन्सचे मालक किरण भाले, मुख्तार अली, किंग्ज एलेव्हन फक्राबादचे मालक शेख इम्रान,नजिर टेलल, साजिद सर, एबी लॉयन्सचे मालक याहिया खान, शेख अजिम, नरसिंमा कॉलनी रायडर्सचे मालक राजिव पामे, माळीवाडा टायगर्सचे मालक अलोक चौधरी,गोविंद हारकळ,पठान मोहला पक्तूनचे मालक अयबखान उर्फ लालु खान, दर्गा मोहल्ला फायटर्सचे मालक मोईज मास्टर, अनिस फारोकी, व्हीआयपी वारीअर्सचे मालक अजिंक्य नखाते, कोहिनूर चँलेंजर्सचे मालक गुलशेर खान मामा, एमबी मास्टर ब्लास्टरचे मालक मकसुद सेठ एम के, पार मोहल्ला पँन्थरचे मालक शेख ईरफान अमजत अन्सारी, मोमीन मेहल्ला युनायटेडचे मालक कलिम अन्सारी,जायकवाडी स्टार्सचे मालक सुबोर सिद्धीकी, फैयाज फारोकी यांनी संघ मालकांनी बोलीत सहभागी होऊन ग्रामिण आणि शहरी भागातील खेळाडूंची खरेदी केली.

टेनिस बॉल ने या स्पर्धा सात डिसेंबर पासून दिवसरात्र खेळवण्यात येणार आहेत.  या स्पर्धेचा अंतिम सामना 21 डिसेंबर रोजी दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत चौदा संघ 96 सामने खेळणार असून हे सर्व सामने दिवस-रात्र होणार आहेत तर टेनिस क्रिकेट डॉट कॉम या युट्यूब चँनेल वर या सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षपण होणार असून. शहरा सह महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील टेनिस बॉल ने खेळा-या खेळाडूं साठी ही मोठी संधी असनार आहे. या लिलावात दहा हजारांच्या मर्यादेत खेळाडूंचा लिलाव करण्यात आला एका पेक्षा जास्त संघ मालकांची बोली सारखीच लागल्यास ड्रॉ काढून खेळाडू त्या संघ मालकास दिला गेला. या वेळी जुनेद खान दुर्रांनी यांनी या स्पर्धे साठी शहरातील ज्या नामवंत व्यावसाईकांनी प्रायोजक म्हणून  जबाबदारी स्विकारली त्या सर्वांचा स्मतिचिन्ह देऊन सत्कार करत आभार मानले. शनिवारी 24 नोहेंबर रोजी गट्टू कारखाण्या वरील शानदार समारोहात सायंकाळी सात वाजता हा खेळाडु लिलाव कार्यक्रम संपन्न झाला. उत्तर रात्री उशिरा पर्यंत हा कार्यक्रम चालला. या साठी शहरातील काही काही मोजक्या मंडळीला निमंत्रित करण्यात आले होते. संघ मालकां सह निमंत्रितांचा या वेळी आयोजक जुनेद खान दुर्रानी सांनी सत्कार केला. पीपीएल च्या पहिल्या सत्रात एकतानगर चँम्पियन्स  यांनी या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. या वेळी या स्पर्धेत कोणता संघ अजिंक्य ठरणार या कडे आता सर्वांचे लक्ष असनार आहे.

No comments:

Post a Comment