तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 November 2018

वैभव गिते यांच्या पाठपुराव्यामुळे मागासवर्गीय बचत गटांना मिळाले 22 कोठी 40 लाख रूपये....!

वैभव गिते यांच्या पाठपुराव्यामुळे मागासवर्गीय बचत गटांना मिळाले 22 कोठी 40 लाख रूपये....!
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
---------------------------------------------------------------
पिलीव/सुजीत सातपुते
अनुसूचित जाती नवबौद्धांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने देण्याची योजना आहे.परंतु या योजनेसाठी दरवर्षी जिल्हानिहाय देण्यात येणारा निधी हा अतिशय तुटपुंजा कमी प्रमाणात आहे .त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त बचतगटांना मिळत नाही शासनाची तरतूद कमी असते. व जिल्हानिहाय प्रस्ताव जास्त असल्यामुळे अनेक प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित राहतात  त्यामुळे वारंवार मागासवर्गीय जनतेला सहाययक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात.त्या अनुशंगाने एन.डी.एम.जे.या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेबांना निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन 22 कोटी चाळीस लाख रूपये मंजुर करण्यात आले असुन तसा शासन निर्णय ही जारी करण्यात आला आहे. अशी माहीती एन.डी.एम.जे.संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष वैभव काटे यांनी दिली .यावेळी संघटनेचे जिल्हासचिव पंकज काटे ,अनिल पारसे,अमोल ढोबले ,विक्रम यादव आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.मागासवर्गीय व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी 2018 -19 या चालू वर्षी अर्थसंकल्पीत निधीमधून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील व्यक्तींच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने मिळण्यासाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेत म्हणजे अनुसूचित जातीच्या व नवबौद्धांच्या हक्काचा निधी आखर्चित राहणार नाही.शिवाय मिनी ट्रॅक्टर ऐवजी मोठे ट्रॅक्टर द्यावेत व बचतगटाऐवजी वैयक्तिक व्यक्तींना ट्रॅक्टर द्यावेत अनुदान 90 टक्के ऐवजी 100 टक्के अनुदान देण्यात यावे असे योजनेत बदलही करावेत असे निवेदन एन.डी.एम.जे या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे  केली होती त्याला अनुसरून शासनाने 22कोटी चाळीस लाख रूपये निधी मंजुर केला आहे.सदर मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.2/11/2018 च्या शासन निर्णयानुसार 22 कोटी 40 लाख रूपये निधी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.यामुळे अनेक जिल्ह्याच्या बचतगटांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.या पाठपुराव्यात नॅशनल दलित मुव्हमेंट चे राज्यमहासचिव अॅड.डाॅ.केवलजी उके तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रविणजी मोरे यांनी मौलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

No comments:

Post a Comment