तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 November 2018

परळीत वाहनाच्या काचा फोडुन 3 लाख 60 हजार रुपये पळविले


ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरीच्या प्रकारामुळे खळबळ

परळी दि.03
    धारुर तालुक्यातील फकीरा जवळा येथील एका व्यक्तीचे वाहनातुन  3 लाख 60 रुपये काढुन नेल्याची घटना परळी शहरातील अंबाजोगाई रोडवर  ट्रॅक्टर एजन्सीच्या कार्यालयासमोर घडली. फकीर जवळा येथील पंडित जगन्नाथ राठोड यांचे हे पैसे चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.
    पंडित राठोड यांनी भाड्याने वाहन करुन आपल्या नातेवाईकासह ट्रॅक्टर खरेदीसाठी परळी शहरात आले होते. शहरातील अंबाजोगाई रोडवरील ट्रॅक्टर एजन्सीच्या समोर वाहन लावून गाडीतील सर्वजण ट्रॅक्टरच्या एजन्सीच्या कार्यालयात गेले. त्यांच्या मागावर असलेल्या दोघा जणांनी वाहनाच्या काचा फोडल्या व वाहनातील 3 लाख 60 हजार रुपये चोरुन नेले. पंडित राठोड हे एजन्सीच्या कार्यालयातुन बाहेर आले असतांना झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कार्य सुरु केले आहे. वाहनातुन पैसे पळविणारे दोघे जण हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
    परळी-अंबाजोगाई रोडवरील असलेल्या एका ट्रॅक्टर एजन्सीकडे ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या धारुर तालुक्यातील फकीर जवळा येथील एका व्यक्तीचे चार चाकीच्या वाहनातुन 3 लाख 60 हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली. वाहनाचे दरवाजे बंद केलेले असतानाही काचा फोडुन चोरटे आत घुसले व रक्कम लांबवली. गाडीतील 3 लाख 60 हजार रुपयाची रक्कम चोरुन नेली. 500 रुपयाचे, 50.000 हजाराचे सात बंड्डल व 100 रुपयाचे दहा हजाराचे एक बंडल असे एकुण 3 लाख 60 हजार रुपये वाहनामध्ये ठेवले होते. ते अज्ञात इसमाने पळवुन नेल्याचे पंडीत राठोड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment