तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 November 2018

परळी तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड द्या जनक्रांती सेनेचे तहसीलदारांना निवेदन


परळी/प्रतिनिधी
परळी शहर आणि तालुक्यातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या अनेक नागरिकांना शासकिय कामकाजाची पुर्ण पद्धत माहित नसल्याने हजारो नागरिक अजूनही रेशन कार्ड पासून वंचित असून त्यांना तातडीने रेशन कार्ड द्यावे अशी मागणी जनक्रांती सेनेच्या वतिने तहसीलदार परळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरूवार दि.1 नोव्हेंबर रोजी जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि, परळी तालुक्यातील व शहरातील अनेक सामान्य लोकांना रेशनकार्ड नसल्याने अन्नधान्य व इतर शासकिय कामकाज, कागदपत्रांची पुर्तता करतांना मोठी अडचण निर्माण होत आहे. अशा तळागाळातल्या लोकांपर्यंत रेशन कार्ड मिळावे या उद्देशाने अनेक लोकांचे रेशन कार्ड मागणी फॉर्म भरून आज तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी जनक्रांती सेनेचे राष्ट्रीय सचिव सचिन लगड यांच्यासह बालाजी गित्ते, राहुल गित्ते, गोविंद राख, मोहन सोळंके, एकनाथ घुंबरे, महादेव गित्ते आदींसह अनेकजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment