तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 November 2018

परिवहन खात्यातील भरतीबाबत धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर सरकार न्यायालयात करणार पाठपुरावा

त्या 832 उमेदवारांना मिळणार दिलासा

मुंबई, दि. २९ - परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांचे भवितव्य नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर धोक्यात आले आहे. याबाबत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारने सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल २०१८ मध्ये परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी 832 जणांची शिफारस केली होती. या निवडीला नागपूर खंडपीठाने जून २०१८ मध्ये स्थगिती दिली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिले आहे.

दरम्यान जानेवारी २०१७ पासून ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे आणि आता ही भरती कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने शेकडो जणांचे भवितव्य अधांतरीत आहे त्यामुळे सरकारने उमेदवारांना दिलासा द्यावा यासाठी धनंजय मुंडेंनी विधान परिषदेत मागणी केली. यानंतर दिवाकर रावतेंनी सरकार उमेदवारांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडेल असे आश्वासन दिले.

No comments:

Post a comment